Virat Kohli Post : पर्थ कसोटी सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. याआधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने X वर अशी एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. पर्थ येथे होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दोन दिवस आधी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले.


खरंतर, कोहलीने त्याच्या 'X' प्लॅटफॉर्मवर 'WROGN' या कपड्यांच्या ब्रँडसोबतचा प्रवास शेअर करताना एक नोट लिहिली, परंतु त्याच्या पहिल्या काही ओळींनी चाहत्यांना धक्का दिला. अनेक चाहत्यांनी कोहलीची ही नोट त्याच्या निवृत्ती, घटस्फोटशी संबंधित असल्याचे वाटले. जेव्हा त्यांनी संपूर्ण पोस्ट वाचली तेव्हा चाहत्यांना समजले की ती पोस्ट निवृत्ती किंवा घटस्फोटशी संबंधित नाही. 






कोहलीने याआधी महत्त्वाच्या वैयक्तिक आणि करिअर अपडेट्सची घोषणा करताना सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या पोस्ट टेम्प्लेटचा वापर केला आहे. 2022 मध्ये कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याबाबतही त्याने अशीच घोषणा केली होती. विराटने शेअर केलेली पोस्ट तुम्ही खाली पाहू शकता.






विराट कोहलीच्या या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. चाहते भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मी एक मिनिट घाबरलो होतो.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'मिनी हार्ट अटॅक.' कदाचित त्याने निवृत्तीची घोषणा केली असेल या विचाराने काही चाहते घाबरले. याबद्दल एका चाहत्याने लिहिले की, 'कृपया हे पांढरे पोस्ट करणे थांबव. माझ्या हृदयाचे ठोके प्रत्येक वेळी वाढतात. ती निवृत्तीची पोस्ट वाटली.






कोहलीची ऑस्ट्रेलियातील कामगिरी


विराट फॉर्ममध्ये झगडत असला तरी टीम इंडियाला विराट कोहलीकडून पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे, कारण या देशात त्याच्याकडे उत्कृष्ट आकडेवारी आहे. कोहलीने 2011 पासून ऑस्ट्रेलियात 13 कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने सहा शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 1352 धावा केल्या आहेत. यामध्ये 169 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कोहलीची येथे सर्वोत्तम कामगिरी 2014-15 मालिकेतील होती, ज्यामध्ये त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये 86.50 च्या सरासरीने चार शतके आणि एक अर्धशतकांसह 692 धावा केल्या.


हे ही वाचा -


Sanju Samson : 5 सामन्यांत धडाकेबाज 3 शतकं, दमदार खेळीचं शानदार गिफ्ट, संजू सॅमसन थेट कॅप्टन!