Social Media On Virat Kohli : इंग्लंडविरोधात विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. 9 चेंडूचा सामना केल्यानंतरही विराट कोहली शून्यावर बाद झाला. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ होय. विराट कोहलीकडून चाहत्यांना आज शतकाची अपेक्षा होती, पण कोहली गोल्डन डकचा शिकार झाला. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके ठोकली आहेत. सचिनच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला एका शतकाची गरज आहे. आज लखनौच्या मैदानात विराट कोहली सचिनच्या शतकांची बरोबरी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. त्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. पण विराट कोहलीला एकाही धाव काढता आली नाही, त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला. विराट कोहलीला डेविड विलीने तंबूचा रस्ता दाखवला.  


सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस?


भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून आज 49 व्या शतकांची अपेक्षा होती, पण चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. विराट कोहली विश्वचषकात पहिल्यांदाच शून्यावर बाद झालाय.  






























वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीचे प्रदर्शन


यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली तुफान फॉर्मात आहे. विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. याआधी विराट कोहलीने तीन अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. विराट कोहलीने सहा सामन्यात 88 च्या सरसरीने 354 धावा केल्या आहेत. आज विराट कोहली खातेही न उघडता बाद झाला. 



सचिन आणि विराटची नेहमीच तुलना -
Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison : सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण  या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता.