Virat Kohli On DRS Controversy : भारतीय कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी DRS च्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत थेट मैदानातच स्टम्पजवळ जाऊन स्टम्पमध्ये बोलत आपला राग दर्शवला होता. त्यानंतर यावर बऱ्याच चर्चा झाल्या अनेक प्रतिक्रिया आल्या पण आता थेट विराटनेच त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 


कोहलीने तिसरी कसोटी संपल्यानंतर शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली तो म्हणाला, "मला या सर्वावर काही बोलायचं नाही. आम्हाला माहित आहे मैदानात काय सुरु होतं. बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना याची कल्पना नाही की मैदानावर काय सुरु होतं." पुढे बोलताना कोहली म्हणाला,"मला असं वाटतं त्याठिकाणी आम्ही यशस्वी झालो असतो, तर कदाचीत आम्हाला लवकर आणखी विकेट मिळाले असते आणि निर्णय बदलू शकला असता." दरम्यान भारताने हा सामना 7 विकेट्सनी गमावल्यामुळे मालिकाही 2-1 ने गमावली आहे.


काय घडलं मैदानात?


रविचंद्रन अश्विनने राऊंड द विकेटने बॉलिंग केली. अश्विनचा हा चेंडू आत वळला आणि थेट एल्गरच्या पॅडवर लागला. भारतीय टीमने जोरदार अपील केल्यानंतर अंपायरने एल्गल आऊट असल्याचा निर्णय दिला. एल्गर भारतासाठी एक महत्वाची विकेट होती.


 






पण एल्गरने या निर्णयावर DRS घेतला. त्यानंतर थर्ड अंपायरने एल्गर आऊट नसल्याचा निर्णय दिला. चेंडू तर स्पष्टपणे पॅडला लागला होता आणि तो खाली राहिला होता. पण थर्ड अंपायरने निर्णय याच्या उलट निर्णय दिला. नेमकं हेच कारण भारतीय संघाच्या रागाला कारणीभूत ठरलं. यामुळे अश्विन चिडला आणि स्टंपजवळ येऊन म्हणाला, "तुम्ही जिंकण्यासाठी इतर काही मार्गाचा अवलंब करा सुपरस्पोर्ट्स."


त्यानंतर विराट कोहली भलताच संतापला. तो स्टंपजवळ गेला आणि म्हणाला, "फ** कॅमेरा टीम, सुपरस्पोर्ट्स हा जोक आहे. ज्यावेळी तुमची टीम चेंडूला चमकवत असते त्यावेळी त्यांच्यावरही लक्ष ठेवत चला. फक्त विरुद्ध टीमवर लक्ष नको."


 



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha