केपटाऊन: टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि त्याचा राग हे वेगळंच समीकरण आहे. विराट कोहली रागाच्या भरात कुणाला काय बोलेल याचा नेम नाही. जर एखाद्याचा चुकीचा निर्णय संघासाठी मारक ठरणार असेल तर मग बोलायलाच नको. अशीच एक घटना भारत आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान घडली. विराट कोहली DRS च्या एका निर्णयावर एवढा भडकला की त्याने स्टंपजवळ येऊन फ** कॅमेरा टीम या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. 


काय घडलं मैदानात?
रविचंद्रन अश्विनने राऊंड द विकेटने बॉलिंग केली. अश्विनचा हा चेंडू आत वळला आणि थेट एल्गरच्या पॅडवर लागला. भारतीय टीमने जोरदार अपील केल्यानंतर अंपायरने एल्गल आऊट असल्याचा निर्णय दिला. एल्गर भारतासाठी एक महत्वाची विकेट होती.


 






पण एल्गरने या निर्णयावर DRS घेतला. त्यानंतर थर्ड अंपायरने एल्गर आऊट नसल्याचा निर्णय दिला. चेंडू तर स्पष्टपणे पॅडला लागला होता आणि तो खाली राहिला होता. पण थर्ड अंपायरने निर्णय याच्या उलट निर्णय दिला. नेमकं हेच कारण भारतीय संघाच्या रागाला कारणीभूत ठरलं. यामुळे अश्विन चिडला आणि स्टंपजवळ येऊन म्हणाला, "तुम्ही जिंकण्यासाठी इतर काही मार्गाचा अवलंब करा सुपरस्पोर्ट्स."


त्यानंतर विराट कोहली भलताच संतापला. तो स्टंपजवळ गेला आणि म्हणाला, "फ** कॅमेरा टीम, सुपरस्पोर्ट्स हा जोक आहे. ज्यावेळी तुमची टीम चेंडूला चमकवत असते त्यावेळी त्यांच्यावरही लक्ष ठेवत चला. फक्त विरुद्ध टीमवर लक्ष नको."


 






महत्त्वाच्या बातम्या :