Virat Kohli Flop Show IND vs NZ Test Series : मुंबईत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीतही विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप दिसला. सामन्याच्या पहिल्या डावात कोहली अवघ्या 04 धावा करून धावबाद झाला होता, त्यानंतर दुसऱ्या डावात कोहलीच्या फलंदाजीतून चांगली खेळी पाहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा होती, पण तसे होऊ शकले नाही. दुसऱ्या डावातही कोहलीचा फ्लॉप शो कायम राहिला. मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावात कोहली केवळ 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कोहलीचा फ्लॉप शो बऱ्याच दिवसांपासून आहे सुरू
हे केवळ मुंबई कसोटीचे नाही, तर विराट कोहलीचा फ्लॉप शो गेल्या काही काळापासून सातत्याने पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीतही कोहली पूर्णपणे फ्लॉप असल्याचे दिसून आले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. या सामन्यात कोहली पहिल्या डावात खाते न उघडता बाद झाला. मात्र, दुसऱ्या डावात त्याने 70 धावा केल्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटीत कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.
पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत कोहलीने पहिल्या डावात 1 धावा काढल्या आणि दुसऱ्या डावात त्याला केवळ 17 धावा करता आल्या. त्याचप्रमाणे मुंबई कसोटीच्या दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून 04 आणि 01 धावा आल्या. म्हणजेच न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटीत सामन्यात 93 धावा केल्या.
बांगलादेश मालिकेतही कोहली ठरला होता फ्लॉप
न्यूझीलंडपूर्वी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतही कोहलीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. चेन्नईत बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीने दोन्ही डावात 6 आणि 17 धावा केल्या. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत कोहलीने 47 आणि 29* धावा केल्या होत्या, पण त्याला अर्धशतकही गाठता आले नाही.
हे ही वाचा -
Rohit Sharma Ind vs Nz Test : हिटमॅनची ताकद बनली मोठी कमजोरी? मुंबई कसोटीतही रोहितचा 'फ्लॉप शो'