India vs New Zealand 3rd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरी कसोटी रोमांचक टप्प्यावर आहे. सध्या कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मवर आहे, पण एक असा फलंदाज आहे ज्याचा पण फॉर्म सध्या खराब आहे. हा फलंदाज दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. खरंतर रोहित शर्माने जबाबदारी स्वीकारून भारतीय संघाचे आघाडीचे नेतृत्व करायला हवे होते, पण तो त्याच्या फलंदाजीत फ्लॉप ठरत आहे. कर्णधार रोहितची ताकद असलेल्या शॉट बॉलवर तो मुंबई कसोटीत दुसऱ्या डावात आऊट झाला. 


मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कर्णधार रोहित शर्माने आपली विकेट गमावली. रोहितची ताकद असलेल्या शॉट बॉलवर तो आऊट झाला. मुंबई कसोटीत तो सलग दुसऱ्यांदा मॅट हेन्रीचा बळी ठरला. हिटमॅनने पहिल्या डावात 18 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 11 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. फिरकी खेळपट्टीवर रोहितने वेगवान गोलंदाजाला आपली विकेट दिली.  


न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेतील 6 डावांमध्ये कर्णधार रोहित शर्माने 2, 52, 0, 8, 18 आणि 11 धावा केल्या आहेत. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान हिटमॅनची कामगिरी खराब होती. रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 4 डावात 6, 5, 23 आणि 8 धावा केल्या.






8 महिन्यांपूर्वी शेवटचे शतक


रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळतो. रोहित शर्माने गेल्या 8 महिन्यांत केवळ 1 कसोटी शतक झळकावले आहे. रोहित शर्माने 7 मार्च 2024 रोजी धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचे कसोटी शतक झळकावले. रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. यानंतर रोहित शर्माने 10 कसोटी डावांमध्ये 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8,18 आणि 11 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रोहित शर्माने गेल्या वर्षभरात एकही शतक झळकावलेले नाही. रोहित शर्माने त्याच्या शेवटच्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47, 47, 58, 64 आणि 35 धावा केल्या आहेत.


हे ही वाचा -


Ind vs Nz 3rd Test : सर जडेजाचा पंजा! न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला, भारतासमोर 147 धावांचे लक्ष्य


India A Faces Ball Tampering Allegations : इशान किशन वादाच्या भोवऱ्यात, टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC देणार शिक्षा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण