Virat Kohli Centuries From September 2022 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात त्रिनिदाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने जिगरबाज खेळी करत शतक झळकावले. ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक अथवा अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरलाय. विराट कोहलीने 11 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. विराट कोहलीने दमदार शतक झळकावत 2018 नंतर विदेशी भूमीवरील शतकाचा दुष्काळ संपवला. त्याच वेळी, कोहलीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत (315 दिवस) क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 8 शतके ठोकली आहेत.
गेल्यावर्षी विराट कोहलीने तब्बल 1019 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शतक झळकावले होते. 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये विराट कोहलीने शतक झळकावले होते. तेव्हापासून त्याच्या बॅटमधून शतकांचा पाऊस पडतोय. आशिया चषक 2022 पासून कोहलीने 8 शतके झळकावली आहेत. आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते. कोहलीच्या बॅटमधून हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले होते. त्यानंतर विराट कोहलीने आठ शतके झळकावली आहेत.
डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने 113 धावांची खेळी केली होती. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 113 धावा केल्या. यानंतर, मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने 166* धावांची शानदार खेळी साकारली. एकदिवसीय सामन्यांनंतर, कोहलीने फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीद्वारे कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला आणि अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत 186 धावा केल्या. 2019 नंतर कोहलीच्या बॅटमधून कसोटीतील हे शतक आले होते.
आयपीएलमध्येही दमदार कामगिरी -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर विराट कोहलीने आयपीएल 16 मध्येही तुफानी फलंदाजी केली. विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने या हंगामात दोन शतके झळकावली. त्याशिवाय आयपीएल १६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू होता. त्याने 14 सामन्यात 53.25 च्या सरासरीने आणि 139.82 च्या स्ट्राईक रेटने 639 धावा चोपल्या होत्या.
वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून विराट कोहलीने 315 दिवसांत 8 शतके लगावली. याशिवाय, सप्टेंबर 2022 पासून कोहलीच्या बॅटमधून सर्वाधिक 6 आंतरराष्ट्रीय शतके आली आहेत. गिलने कोहलीसोबत 6 शतके झळकावली आहेत. बाबर आझम आणि स्टीव्ह स्मिथ 5-5 शतकांसह कोहली आणि गिलच्या मागे आहेत.
आणखी वाचा :
Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद