Korea Open Title Chirag Shetty And Satwiksairaj Rankireddy : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या नंबर एक जोडीचा फायनलमध्ये पराभव केला. कोरिया ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी 17-21, 21-13, 21-14 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. बॅडमिंटनमधील जगातील अग्रमानांकित फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जोडीला हरवत भारतीय जोडीने पुरुष दुहेरीमध्ये कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटन खिताब जिंकला. चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी दमदार कामगिरी केली. इंडोनेशियाच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये 17-21 असा विजय मिळवला होता. पण चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी जोरदार पुनरागमन केले. दोघांनी पुढील दोन्ही सेट जिंकत विजय मिळवला.
पहल्या सेटमध्ये पराभव झाल्यानंतर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने हार मानली नाही, त्यांनी जोरदार पुनरागमन केले. भारतीय जोडीने पुढील दोन्ही सेट सहज जिंकले. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला वरचढ होऊ दिले नाही. अखेरच्या दोन सेटमध्ये 21-13 आणि 21-14 अशा फरकाने चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी जोडीने बाजी मारली. याआधी भारतीय जोडीने सेमीफायनलमध्ये दुसऱ्या मानंकित जोडीचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. आता त्यांनी अव्वल क्रमांकाच्या जोडीचा पराभव करत विजय मिळवला आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर निर्वादित वर्चस्व गाजवले. दोघांनी प्रत्येकवेळा दमदार खेळी करत जेतेपदाकडे आगेकूच केली. प्रतिस्पर्धी खेळाडूंना सामन्यात पुढे जाऊ दिले नाही.. अन् गेले तरी जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. उपांत्य फेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग यांचा 40 मिनिटांच्या गेममध्ये 21-15 आणि 24-22 असा पराभव केला. सात्विक आणि चिराग यांचा चिनी जोडीवरचा हा पहिलाच विजय ठरला. याआधी भारतीय जोडीला चिनी जोडीसमोर दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या वर्षी, चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज या जोडीने इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकले आहेत. सात्विक आणि चिराग या जोडीने अनेक जेतेपदे पटकावली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय थॉमस कपमध्येही भारतीय जोडीने सुवर्णपदक पटकावले. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर १००० जेतेपद पटकावली आहेत.