Virat Kohli's ICC Test Rankings : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेवर भारताने 2-1 ने कब्जा केला. त्यानंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली आहे. विराट कोहलीने फलंदाजीत मोठी झेप घेतली आहे.  कसोटीत आठ क्रमांकाची झेप घेत विराट कोहली 13 व्या क्रमांकावर पोहचला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 364 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 186 धावांची खेळी केली होती. यामुळे विराट कोहलीने आठ क्रमांकाची झेप घेत 13 व्या स्थान गाठलेय. 186 धावांच्या दमदार खेळीमुळे विराट कोहलीला 54 रेटिंगचा फायदा झाला आहे. विराट कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही एका क्रमांकाचा फायदा झाला आहे. 739 रेटिंगसह रोहित शर्मा दहाव्या स्थानावर पोहचला आहे. ऋषभ पंत कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. तर गोलंदाजीत अश्विन याने अव्वल स्थान गाठलेय. 869 रेटिंगसह अश्विन कसोटीत अव्वल स्थानावर आहे. जेम्स अँडरसनला पछाडत अश्विनने पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर आहे. 
 





23 कसोटीनंतर विराट कोहलीची शतकी खेळी -
1205 दिवस आणि 23 कसोटी सामन्यानंतर विराट कोहलीनं शतकाला गवसणी घातली आहे. मागील तीन वर्षांपासून विराट कोहलीची बॅट शांतच होती. 2019 मध्ये बांगलादेशमद्ये विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावले होते. त्यानंतर तब्बल 1205 दिवसानंतर विराट कोहलीने शतक झळकावलं. विराट कोहलीने 28 वे कसोटी शतक झळकावलं. 
 
अक्षर पटेलने मारली बाजी - 
दिवसेंदिवस आपल्या अष्टपैलू खेळीने अक्षर पटेल क्रीडा विश्वाचं लक्ष वेधथ आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेत अक्षर पटेल याने 264 धावांचा पाऊस पाडला. यामुळे त्याशिवाय धारधार गोलंदाजाही केली. परिणामी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अक्षर पटेल चौथ्या स्थानावर पोहचलाय. तर रविंद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल चार अष्टपैलू खेळाडूमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. 






7 जून रोजी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल - 
भारताने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चँपिनशिपची फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. 7 जून रोजी लंडनमधील द ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनलचा सामना होणार आहे. 


आणखी वाचा :
मेहुण्याच्या लग्नात रोहित शर्मा व्यस्त, पहिल्या वनडेत हार्दिक करणार संघाचं नेतृत्व