Virat Kohli Century India vs South Africa 1st ODI : विराट कोहलीने रांची वनडेत अफलातून फलंदाजी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील 52वे शतक झळकावले. विराटने अवघ्या 120 चेंडूत 135 धडाकेबाज खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 7 गगनचुंबी षटकार आणि 11 चौकार मारले. तब्बल नऊ महिन्यांनंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आलेले हे शतक त्यामुळे अधिक खास ठरले. 

Continues below advertisement


स्वतः विराटने तर या शतकाचा आनंद लुटलाच, पण टीम इंडियाच्या खेळाडूंनीही त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीचा जबरदस्त जल्लोष केला. रोहित शर्मा पण आनंदी दिसला, पण त्यावेळी रोहितच्या तोंडातून अपशब्द निघाले. हेड कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


विराटच्या शतकानंतर नेमकं काय घडलं?


विराट कोहलीने शतक पूर्ण करताच, पॅव्हेलियनमध्ये उभा असलेला रोहित शर्मा आनंदी झाला. यावेळी, त्याच्या उत्साहात त्याने भाषेच्या मर्यादा ओलांडल्या. रोहितच्या अशा रिअॅक्शन चाहत्यांना नवीन नाहीत, परंतु या वेळीही त्याचा तोच बेधडक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आणि व्हिडिओ चक्क व्हायरल झाला. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही विराट कोहलीच्या शतकाचे स्वागत केले. विराट कोहली बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा गौतम गंभीरने त्याला मिठी मारली.






विराटने शतकाचं सेलिब्रेशन कसं केलं? 


रोहित आणि गंभीर यांच्या रिअॅक्शनसारखीच विराटची सेलिब्रेशन स्टाईलही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतली. विराटने उंच उडी मारून आक्रमक अंदाजात बॅट उंचावली. अनेक दिवसांनी विराटचा असा अवतार पाहायला मिळाला. त्यानंतर त्याने गळ्यातील अंगठीला किस केला आणि हात जोडून देवाचे आभार मानले.






विराटचं शतक इतकं खास का होतं?


हे शतक विराट कोहलीसाठी अनेक अर्थांनी अविस्मरणीय ठरले. एका फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आता त्याच्या नावावर आहे. यापूर्वी वनडेमध्ये 51 शतकांसह हा मान सचिन तेंडुलकरकडे होता. विराटचे हे शतक इंटरनॅशनल क्रिकेटमधील 7000वे शतक ठरले, ज्यामुळे त्याची ऐतिहासिक किंमत अधिकच वाढली. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेत सर्वाधिक एकूण 6 शतकं झळकावणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.


हे ही वाचा -


Ind vs Sa 1st ODI : दोन स्टार चमकले, दोन युवा मात्र फिके पडले! रांचीमध्ये कोहलीचं शतक, रोहितची वर्ल्ड-रेकॉर्ड फटाकेबाजी, द. आफ्रिकेसमोर 350 धावांचा डोंगर