Virat Kohli records 52nd ODI Century : जेव्हा एखाद्या खेळाडूच्या क्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्हं उभे राहू लागतात, त्याच्या भविष्यात शंका घेतली जाते, तेव्हा उत्तर देण्याचा एकच मार्ग असतो... दमदार प्रदर्शन. भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने तेच करून दाखवले. वनडे क्रिकेटमधील त्याच्या भूमिकेवर सतत चर्चा सुरू असताना विराटने बॅटने प्रत्युत्तर सर्वांना गप्प केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने अप्रतिम शतक ठोकत टीकाकारांपासून ते बीसीसीआयमधील निर्णय घेणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना योग्य उत्तर दिलं.

Continues below advertisement

Continues below advertisement

विराट कोहलीने रांचीत ठोकले तिसरे शतक

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कोहलीसाठी तो दौरा काही खास ठरला नव्हता. पण रांचीतील JSCA स्टेडियमवर मात्र विराट कोहलीने शतक झळकावलं. या मैदानावर आधीच दोन शतके झळकावलेल्या कोहलीने आपल्या शानदार रेकॉर्डला पुढे नेत येथे तिसरं शतक ठोकले.

'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! 

विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हे त्याचे 52 वे एकदिवसीय शतक आणि एकूण 83 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा क्रिकेटच्या एकाच स्वरूपात सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके झळकावली होती. विराट कोहलीने 102 चेंडूत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. या डावाच्या सुरुवातीपासूनच तो आक्रमक खेळला. त्याने रोहित शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारीही केली. शतक गाठण्यासाठी विराटने त्याच्या डावात 7 चौकार आणि 5 षटकार मारले. या वर्षीचे हे त्याचे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावले होते.  

विराट कोहलीच्या सेलिब्रेशन वेळी नेमकं काय घडलं?

रांचीच्या मैदानावर अनपेक्षितपणे एक थरारक प्रसंग घडला. विराट कोहलीने जॅन्सनचा चेंडू थर्डमनकडे खेळत शतक पूर्ण केले आणि हेल्मेट काढून गळ्यातील अंगठीला किस करून सेलिब्रेशन करत असतानाच अचानक एक चाहता सुरक्षा भेदून थेट मैदानात घुसला. क्षणात धावत आलेल्या त्या चाहत्याने कोहलीच्या पायाशी नतमस्तक झाला. संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की सुरक्षा रक्षक काही क्षणांसाठी अवाक् झाले. मात्र त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत त्या चाहत्याला मैदानाबाहेर नेलं. या अनपेक्षित घटनेने ड्रेसिंग रूममधील रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही क्षणभरासाठी आश्चर्यचकित केलं.

हे ही वाचा - 

नाकावर टिच्चून विराट–रोहित कसोटीत पुन्हा येणार? इंग्लंडच्या चॅम्पियन खेळाडूच्या वक्तव्यानं क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय म्हणाला?