India vs South Africa 1st ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेचा पहिला सामना रांचीतील झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात प्रेक्षकांना भरपूर रोमांच अनुभवायला मिळाला, कारण ‘रो-को’ची जोडी पुन्हा एकदा मैदानात चमकताना दिसली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने 8 विकेट्सच्या बदल्यात 349 धावा उभारल्या.

Continues below advertisement

Continues below advertisement

विराटचा वादळ आणि रोहितचा विश्वविक्रम

विराट कोहलीने 120 चेंडूत 135 धडाकेबाज धावा करून संघाचा कणा सांभाळला. या खेळीमध्ये त्याने 11 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याचबरोबर त्याने वनडेमध्ये 52 शतके पूर्ण करत एकाच फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा अनोखा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकरच्या टेस्टमधील 51 शतकांच्या विक्रमालाही मागे टाकले.

हिटमॅन रोहित शर्मा देखील चमकला. त्याने 51 चेंडूत 57 धावा ठोकत 3 जोरदार षटकारांसह वनडे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीची बादशाही संपुष्टात आणली. रोहित आता वनडे इतिहासातील सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे.

दोन स्टार चमकले, दोन युवा मात्र फिके पडले! 

दुसरीकडे, अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या तरुणांनी मात्र अपेक्षित कामगिरी केली नाही. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या जागी खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालने फक्त 16 चेंडूत 18 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या ऋतुराज गायकवाडकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या, पण तो केवळ 14 चेंडूत 8 धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरनेही निराशा केली आणि 19 चेंडूत फक्त 13 धावा जमवू शकला. 

शेवटी कर्णधार केएल राहुलचा तडाखा

शेवटी कर्णधार केएल राहुलच्या शानदार अर्धशतकी खेळी आणि रवींद्र जडेजाच्या चपळाई आणि उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने 349 धावांचा मोठा स्कोअर केला. राहुलने 56 चेंडूत 60 धावांची खेळी आणि जडेजाने 20 चेंडूत 32 धावांची उपयुक्त खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना नांद्रे बर्गरने 65 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, ओथनिएल बार्टमनने 60 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. मार्को जॅन्सेनलाही दोन विकेट्स मिळाल्या पण त्याने 76 धावा दिल्या. कॉर्बिन बॉशने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात दोन विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा - 

Virat Kohli Century : किंग कोहलीचं शतक अन् रांचीत गोंधळ! चाहता भर मैदानात धावत सुटला, विराटच्या सेलिब्रेशनवेळी नेमकं काय घडलं?