Virat Kohli Rohit Sharma To Come Out Of Test Retirement : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-0 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. कोलकाता आणि गुवाहाटी येथे भारताने घरच्या परिस्थितीतही प्रतिस्पर्ध्याला धक्का देऊ शकला नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या पराभवाला ट्रांजिशनचा काळ जबाबदार ठरवत संघातील अनुभवी खेळाडूंच्या कमतरतेकडे लक्ष वेधले.

Continues below advertisement


विराट–रोहितच्या पुनरागमनाच्या चर्चा पुन्हा जोरात


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी अचानक संन्यासाची घोषणा केली. या तिघांच्या गैरहजेरीचा परिणाम संघाच्या कामगिरीवर स्पष्ट दिसून आला. भारतीय फलंदाजी दोन्ही सामन्यांत पूर्णपणे कोसळली. कोलकात्यात केवळ 124 धावांचे लक्ष्य असताना टीम इंडिया 93 धावांतच गारद झाली. तर गुवाहाटीमध्येही परिस्थिती फारशी बदलली नाही. दरम्यान, माजी इंग्लिश क्रिकेटपटू केविन पीटरसन यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या संभाव्य पुनरागमनाबाबत मोठे विधान केले आहे.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल केविन पीटरसन काय म्हणाला?


पीटरसन म्हणाला, "मीडियामध्ये काय लिहिलं जातं यावर मी नेहमी विश्वास ठेवत नाही. पण त्यातील अर्धसुद्धा खरं असेल की विराट आणि रोहित पुन्हा कसोटी खेळण्याचा विचार करत आहेत, तर हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यायला हवा." 


तो पुढे म्हणाला की, " कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवण्याचा विषय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आणि जर जगातील दोन सर्वात मोठे क्रिकेट स्टार पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये उतरण्याची इच्छा व्यक्त करत असतील, तर त्यांनी नक्कीच खेळायला हवे...." सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची उणीव किती जाणवते आहे, हे या मालिकेत स्पष्ट झाले. त्यामुळे कोहली–रोहित यांचे संभाव्य पुनरागमन हा भारतीय क्रिकेटसाठी निर्णायक ठरू शकेल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.






हिटमॅनचा धमाका, रांची स्टेडियम हादरलं! 


दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली याने दुसऱ्या विकेटसाठी जबरदस्त 136 धावांची भागीदारी केली. पण, रोहित शर्मा मार्को जॅन्सेनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. 51 चेंडूत 57 धावा काढल्यानंतर रोहित बाद झाला. त्याने त्याच्या डावात पाच चौकार आणि तीन षटकार मारले.   


हे ही वाचा -


Rohit Sharma Most sixes in ODIs : हिटमॅनचा धमाका, रांची स्टेडियम हादरलं! रोहित शर्माने शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची केली राखरांगोळी, बनला NO-1