Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला टी-20 सामना काल पार पाडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर 62 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम झाला आहे. कालच्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने 44 धावांची खेळी केली. या खेळीमुळे टी 20 सामन्यात रोहित शर्माच्या नावावर 3 हजार 307 धावा झाल्या आहेत. आत्तापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम काल झाला. कालच्या सामन्यात रोहितने 44 धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने विराट कोहली आणि मार्टिन गप्टील यांना मागे टाकले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने 2 चौकार आणि एक षटकार लगावत 32 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने या खेळीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 3 हजार 307 धावा पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, विराटच्या नावावर 97 सामन्यांत 3 हजार 296 धावा असून, गप्टीलच्या नावावर 112 सामन्यांत 3 हजार 299 धावा आहेत. रोहित या सामन्याआधी तिसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या खेळीच्या जोरावर रोहितने पहिलं स्थान मिळवलं आहे.
टी-20क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
रोहित शर्मा - 123 सामने, 3307 धावा
मार्टिन गप्टिल - 112 सामने, 3299 धावा
विराट कोहली - 97 सामने - 3296 धावा
रोहित शर्माची टी-20 कारकिर्द
सामने 123
धावा - 3307
शतके - 4
अर्धशतके - 26
षटकार 155
दरम्यान, भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात भारताने (Team India) श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेला 20 षटकांत 137 धावांवर रोखत 62 धावांनी सामना जिंकला.