IND vs SL : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची (Team India) सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाने प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला 39.4 षटकांत 215 धावांत ऑलआउट केले. पण त्यानंतर फलंदाजीला उतरताना टीम इंडियाची टॉप ऑर्डर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीचाही (Virat Kohli) सहभाग होता. या सामन्यात कोहलीला केवळ 4 धावा करता आल्या. त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने (Lahiru Kumara) उत्कृष्ट गोलंदाजी करत बोल्ड केले.


असा बोल्ड झाला कोहली, पाहा VIDEO


विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाहिरू कुमाराने विराट कोहलीला कशाप्रकारे अप्रतिम चेंडू फेकत बाद केलं. कुमाराने फेकलेला चेंडू कोहलीच्या बॅटच्या आतीलकडेला लागून थेट स्टंपकडे गेला. कोहलीला हा चेंडू अजिबात समजू शकला नाही. बाद झाल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया अशी होती की त्याला चेंडू अजिबात समजला नाही. चेंडू त्याच्या बॅटला आदळल्यानंतर ऑफ स्टंपला लागला. कोहलीला बाद केल्यानंतर लाहिरू कुमाराने देखील या विकेटचं सेलिब्रेशन जल्लोषात केलं.
गेल्या सामन्यात शतक झळकावले






पहिल्या सामन्यात झळकावलं होतं शतक


मालिकेत याआधी झालेल्या गुवाहाटी येथील एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. त्या सामन्यात त्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक होते. ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण यावेळी तो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 1 चौकार आला.


हे देखील वाचा-