Virat Kohli 3,000 Runs In World Cup : रनमशील विराट कोहलीने (Virat Kohli) विश्वचषकात आणखी एक रेकॉर्डला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरोधात 37 धावांची छोटेखानी खेळत करत विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे. विराट कोहलीने विश्वचषकात (वनडे-टी20) तीन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. बांगलादेशविरोधात विराट कोहलीनं या रेकॉर्डवर शिक्कामोर्तब केलेय. विश्वचषकात तीन हजार धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय. बांगलादेशविरोधात विराट कोहलीने 28 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे.


विराट कोहलीने बांलादेशविरोधात 37 धावांची खेळी करताच टी20 विश्वचषकात 1200 धावांचा पल्ला पार केला. कोहली टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरलाय. त्यानं 30 डावात 63.52 च्या सरासरीने आणि 130 च्या स्ट्राईक रेटने 1207 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटमधून 12 अर्धशतकं निघाली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 इतकी आहे. 


विराट कोहलीने वनडे विश्वचषकात 37 डावात 60 च्या सरासरीने 1795 धावांचा पाऊस पाडलाय. वनडे विश्वचषकात विराट कोहलीने पाच शतके आणि 12 अर्धशतके ठोकली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 इतकी आहे. 2023 वनडे विश्वचषकात विराट कोहली सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाज ठरला होता. त्याने 11 सामन्यात 95.62 च्या सरासरीने 765 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये तीन शतके आणि सहा अर्धशतकाचा समावेश होता. 




टी20 वर्ल्डकप 202 मध्ये विराटची बॅट शांतच 


टी20 विश्वचषकात विराट कोहलीला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. साखळी फेरीत विराट कोहलीची बॅट शांतच राहिली. विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नव्हती. सुपर 8 मध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून छोटेखानी खेळी निघाल्या आहेत. अफगाणिस्तानविरोधात 24 तर बांगलादेशविरोधात 37 धावांचं योगदान दिलेय. त्याआधी सुरुवातीच्या तीन सामन्यात त्याला फक्त पाच धावाच करता आल्या होत्या. आयर्लंडविरोधात एक तर पाकिस्तानविरोधात चार धावा काढून बाद झाला होता. अमेरिकाविरोधात विराटला खातेही उघडता आले नव्हते. 


सुपर 8 मध्ये विराट कोहली लयीत आल्याचं दिसले. अफगाणिस्तानविरोधात त्याने 24 चेंडूवर 24 धावांची खेळी केली होती. यामध्ये एका षटकाराचा समावेश होता. आता बांगलादेशविरोधात शानदार सुरुवात मिळाली होती. मोठ्या खेळीमध्ये रुपांतर करु शकला नाही. बांगलादेशविरोधात विराट कोहलीने तीन षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या.