Virat Kohli Stats : यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली भन्नाट फॉर्मात आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा रतीब सुरु आहे. विराट कोहलीने नऊ सामन्यात सातवेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारताच्या विजयात विराटचा सिंहाचा वाटा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 9 सामन्यात 99 जबरदस्त सरासरीने 594 धावांचा पाऊस पाडला आहे. सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम आहे. मागील 20 वर्षांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली सचिनचा विक्रम मोडणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.



विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. 20 वर्षांनंतरही हा विक्रम अद्याप कुणालाही मोडता आलेला नाही. आता विराट कोहली या रेकॉर्डच्या जवळ पोहचला आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीकडे हा रेकॉर्ड मोडण्याची मोठी संधी आहे.

विराट कोहलीकडे सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी -

विराट कोहलीने सध्याच्या विश्वचषकात 594 धावांचा पाऊस पाडला आहे. विश्वचषकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून विराट कोहली फक्त 80 धावा दूर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी विराटला सेमीफायनलच्या सामन्यात मोठी खेळी करावी लाघणार आहे. भारताने उपांत्य फेरीत विजय मिळवला, तर विराटकडे हा रेकॉर्ड तोडण्यासाठी दोन सामने मिळतील. विराट कोहलीकडे सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची नामी संधी आहे.

एक विश्वचषकात सर्वाधिक धावा -

एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, त्याने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 659 धावा केल्या होत्या. 2019 मध्ये रोहित शर्मा या विक्रमाच्या जवळ पोहचला, पण मोडता आला नाही. यंदाच्या विश्वचषकात सचिनचा हा विक्रम अबाधित राहणार की मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

विश्वचषकात भारतीय फलंदाजांचा दबदबा -

यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाजांचा दबदबा दिसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी खोऱ्याने धावा काढल्या. त्याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही मोठं योगदान दिले. विराट कोहलीने आतापर्यंत 594 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 501 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरने नऊ सामन्यात 421 धावा केल्या आहेत. केएल राहुलने चमकदार कामगिरी केली आहे. राहुलने 400 च्या आसपास धावा केल्या आहेत.