BCCI Central Contracts News : आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) टीम इंडियाचे दोन दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा टॉपवर चमकले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार खेळ करत विराट कोहलीने मोठी झेप घेतली असून तो चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माने आपले अव्वल स्थान कायम ठेवत प्रथम क्रमांकाचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
मात्र, या कामगिरीनंतरही दोघांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या ग्रेडवर मोठा परिणाम होऊ शकतो. बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये यंदा A+ ग्रेडमध्ये विराट आणि रोहित यांना स्थान दिले जाणार नाही, अशी चर्चा रंगली आहे. दोन्ही खेळाडूंनी कसोटी आणि टी-20 स्वरूपातून निवृत्ती घेतल्याने आता ते केवळ एकदिवसीय क्रिकेटपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे बोर्ड त्यांचा ग्रेड डाऊन करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय 22 डिसेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक AGM बैठकीत घेतला जाणार आहे. याच बैठकीत पुढील सत्रासाठीच्या नवीन कराराची रूपरेषा निश्चित केली जाईल. दरम्यान, वरिष्ठ क्रिकेटर्सचे ग्रेड कमी झाल्यास शुभमन गिलसारख्या युवा खेळाडूंना वरच्या श्रेणीमध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलग संधी आणि जबाबदाऱ्या मिळत असलेल्या शुभमनला म्हणजेच लॉटरी पुन्हा लागू शकते.
मागील सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या A+ ग्रेडमध्ये किती खेळाडू होते?
1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीतील करारानुसार टी20 मधून निवृत्त असूनही बीसीसीआयने कोहली आणि रोहित यांना A+ ग्रेडमध्ये ठेवले होते. साधारणपणे या ग्रेडमध्ये तीनही फॉर्मेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंनाच स्थान मिळते. मागील करारात A+ ग्रेडमध्ये हे चार खेळाडू होते. विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यापैकी बुमराह तीनही फॉर्मेट खेळतो, तर जडेजाही टी20 मधून निवृत्त झाला आहे.
आता डिमोशनची शक्यता
कोहली आणि रोहित यांनी दोन्ही छोट्या फॉर्मेटनंतर कसोटीलाही अलविदा केल्याने बीसीसीआय त्यांना A+ ग्रेडमधून खाली उतारण्याची शक्यता आहे. जर असा निर्णय झाला तर दोघांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. दोन्ही खेळाडूंच्या वार्षिक पगारात तब्बल 2 कोटी रुपयांची कपात होऊ शकते.
- A+ ग्रेड : 7 कोटी रुपये
- A ग्रेड : 5 कोटी रुपये
- B ग्रेड : 3 कोटी रुपये
- C ग्रेड : 1 कोटी रुपये
सध्या दोन्ही खेळाडू फक्त वनडे फॉर्मेटमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे A+ वर्गात त्यांचा समावेश राहणे कठीण समजले जात आहे. आणि जर त्यांना B ग्रेडमध्ये टाकले गेले, तर केवळ 3 कोटी रुपये मिळतील.
शुभमन गिलची लागणार लॉटरी
सध्याचा भारतीय कर्णधार शुभमन गिल सर्वच फॉर्मेटमध्ये खेळत आहे. कसोटी व वनडेमध्ये कर्णधार आणि टी20 मध्ये उपकर्णधार असल्यामुळे गिलला A ग्रेडमधून A+ ग्रेडमध्ये बढती मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. सध्या त्याला 5 कोटी मिळतात, पण A+ ग्रेड मिळाल्यास ही रक्कम 7 कोटींवर जाईल.
हे ही वाचा -