Kritika Kamra Gaurav Kapur Relationship Confirmed: गेल्या काही काळापासून टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा (Kritika Kamra) आणि क्रिकेट होस्ट, अभिनेता गौरव कपूर (Gaurav Kapur) यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. अशातच आता या अफवा राहिल्या नसून या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. कृतिका कामरा आणि गौरव कपूर एकमेकांना डेट करत आहेत. बुधवारी कृतिका कामरानं सोशल मीडियावर एक पोस्ट करुन दोघांचं नातं ऑफिशिअल केलं. कृतिकानं केलेल्या पोस्टवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
कृतिका कामरानं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिनं गौरव कपूरसोबत नाश्ता करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये कृतिका आणि गौरव एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र बसलेले दिसतायत. कृतिका कामरानं फोटो शेअर करताना एक कॅप्शनही लिहिलंय, "ब्रेकफास्ट विद" कृतिकानं फोटो शेअर करताना असं कॅप्शन देण्यामागचं कारणंही खास आहे. गौरव कपूरचा 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन'हा शो विशेष लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात गौरव कपूर क्रिडा विश्वातील दिग्गजांसोबत ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आणि त्यासोबतच तो त्यांच्या मुलाखती घेतो. विराट कोहली, रोहित शर्मा, एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, मिताली राज, सूर्यकुमार यादव आणि अशा अनेक दिग्गजांच्या त्यानं घेतलेल्या विविध मुलाखती व्हायरल झालेल्या. त्यामुळेच गौरवसोबतचे फोटो शेअर करताना कृतिकानं खास कॅप्शन दिलं आहे.
कृतिका कामराची खास पोस्ट (Kritika Kamra Social Media Post)
कृतिकानं दोघांचे फोटो शेअर करुन आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे. कृतिकानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये गौरव आणि ती दोघेही एकमेकांचे फोटो क्लिक करताना दिसत आहेत. दोघेही एकत्र ब्रेकफास्ट एन्जॉय करताना दिसत आहेत. कृतिकानं ब्रेकफास्टच्या फोटोंसोबतच आणखी काही फोटो शेअर केलेत. एका फोटोत दोघांचे केवळ शूज दिसतायंत, ज्या फोटोवर रिलेशनशिप Cheesy असण्यासंदर्भातलं एक वाक्य लिहिलंय आहे. तर शेवटी एक व्हिडीओ आहे. त्यामध्ये दोन कॉफी मग दिसत असून त्या कॉफी मगवर 'Bubby's' हा शब्द लिहिलेला आहे.
कृतिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, तिनं 'कितनी मोहब्बत है' या टेलिव्हिजन मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.त्यानंतर ती 'कुछ तो लोग कहेंगे' आणि 'रिपोर्टर्स'सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसलेली. याव्यतिरिक्त तिनं वेब सीरिज आणि सिनेमांमध्येही काम केलंय. 'तांडव', 'बॉम्बे मेरी जान' आणि 'भीड' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. कृतिका अलिकडेच नेटफ्लिक्सवरील 'सारे जहाँ से अच्छा' या सीरिजमध्ये दिसलेली. ती सध्या पीपली लाईव्ह फेम दिग्दर्शक अनुषा रिझवीच्या आगामी वुमन सेंटर ड्रामा फिल्मचं शूटिंग करतेय.
क्रिकेट प्रेझेंटर बनण्यापूर्वी गौरव कपूरनं व्हीजे आणि अभिनेता म्हणून काम केलंय. त्याचा स्वतःचा 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' हा शो आहे. या शोमध्ये त्यानं विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, स्मृती मानधना, नीरज चोप्रा आणि मिताली राज यांसारख्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याचा शो क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
दरम्यान, दोघांच्याही वैयक्तिक आयु्ष्याबाबत बोलायचं झालं तर, कृतिकानं यापूर्वी टेलिव्हिजन अभिनेता करण कुंद्राला डेट केलं आहे. त्याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर, अभिनेत्रीचे जॅकी भगनानीशी नाव जोडलं गेलेलं. तर, गौरवनं 2014 मध्ये मॉडेल किरत भट्टलशी लग्न केलेलं. पण, दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही, 2021 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :