Team India Shubman Gill Captaincy Inside Story : भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या अलीकडच्या काही बदलांनी चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला. रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर काही तासातच शुभमन गिलच्या हातात टीमची धुरा सोपवण्यात आली. या निर्णयावर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. अनेकांनी दावा केला की मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या आगमनानंतरच हा बदल झाला. मात्र आता या संपूर्ण प्रकरणाची खरी ‘इनसाइड स्टोरी’ समोर आली आहे.
गिल कर्णधार होणार 2023 मध्येच ठरलं होतं...
बीसीसीआयचे माजी निवडकर्ते सलिल अंकोला यांनी खुलासा केला की, शुभमन गिलला ‘भविष्यातील कर्णधार’ म्हणून खूप आधीच तयारी करण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्येच जेव्हा गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान फॉर्म दाखवत शतक ठोकत होता, तेव्हाच निवड समिती, टीम मॅनेजमेंट आणि वरिष्ठ खेळाडूंनी ठरवले होते की रोहित शर्माच्या नंतर भारतीय संघाची कमान हवीच तर ती गिलच्या हातात गेली पाहिजे.
अंकोला म्हणाले की, “आम्हाला नेहमीच माहिती होते की गिल एक दिवस भारताचे नेतृत्व करणार. 2023 मध्येच तो आमच्या भावी कर्णधारांच्या यादीत होता.” त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि मैदानावरील परिपक्वतेमुळे तो इतर खेळाडूंपेक्षा उठून दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गंभीर आल्यानंतर नाही… रोडमॅप आधीच तयार होता
कोच गौतम गंभीरने गिलला कर्णधार बनवण्यात मोठी भूमिका बजावली, असा समज चाहत्यांमध्ये होता. मात्र अंकोला यांच्या वक्तव्याने हा समज पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण गिलच्या कप्तानीचा निर्णय गंभीर टीममध्ये येण्याच्या जवळपास दोन वर्ष आधीच घेण्यात आला होता. त्यामुळे गिलला ही जबाबदारी गंभीरमुळे मिळाली, हा दावा आधारहीन ठरतो.
पहिल्याच संधीमध्ये गिलची तुफानी कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जेव्हा शुभमन गिलने पहिल्यांदा कसोटी कर्णधार म्हणून मैदानात पाऊल टाकले, तेव्हा त्याने संधीचे सोनं करून दाखवले. 5 सामन्यांत तब्बल 756 धावा ठोकल्या. कठीण परिस्थितीत भारताला 2-2 अशी मालिका वाचवून दिली. अंकोला म्हणाले की, “इंग्लंडच्या परिस्थितीत 750 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू मानसिकदृष्ट्या किती मजबूत आहे, यावर प्रश्नच उरत नाही.”
गिल नसले की भारतची ‘ताकद’ कमी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेत गिल दुखापतीमुळे खेळू शकला नाही आणि भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने संघातील गिलचे महत्त्व आणखी स्पष्ट झाले.
हे ही वाचा -