Abu Dhabi T10 League मधील खेळाडूंचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आधी धमाकेदार फलंदाजी करतानाचा एका फलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता एका गोलंदाजाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची पद्धत पाहून तुम्ही खरंच थक्क व्हाल आणि विचारात पडला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.





सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. या गोलंदाजाचं नाव केविन कोथिगोडा असं असून तो श्रीलंकेमधील रहिवाशी आहे. केविन कोथिगोडा हा एक स्पिनर असून उजव्या हाताने गोलंदाजी करतो. गोलंदाजी करताना केविनचा एक हाथ मागे जातो. केविन 'मराठा अरेबियन्स'च्या संघातून खेळत आहेत. एवढंच नाहीतर केविन बऱ्याचदा हटके गोलंदाजीच्या नादात पडला देखील आहे.





व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्विटर यूजर @PaulRadley ने शेयर केला असून ते पत्रकार आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजण अशाप्रकारची गोलंदाजी पाहून हैराण आहे. अनेक ट्विटर युजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "श्रीलंकेचा इतिहास आहे, अशा पद्धतीने गोलंदाजी करणाऱ्यांबाबत"


दरम्यान, केविन कोथिगोडा याची गोलंदाजी करण्याची पद्धत आगळी-वेगळी असली तरी, तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याच्या या अनोख्या गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी त्याच्यापासून थोडेसे जपूनच असतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :