Vinod Kambli Birthday : भारतीय क्रिकेट संघातील सर्वात तेजस्वी स्टारपैकी एक मानला जाणारा विनोद कांबळी याने 18 जानेवारी रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा केला. एकेकाळी तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा विनोद कांबळी आज ग्लॅमर जगतापासून दूर आहेत. पण क्रिकेट कारकिर्दीपेक्षा तो बाहेरील गोष्टीमुळे जास्त चर्चेत राहिला आहेत. वाईट सवयींमुळे त्याची क्रिकेट करिअर संपली. एक काळ असा होता जेव्हा विनोद कांबळी सचिन तेंडुलकरपेक्षा भारी मानला जात होतो.  


जन्म आणि कुटुंब


विनोद कांबळीचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी मुंबईतील कांजूर मार्ग येथील इंदिरा नगर येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव गणपत कांबळी होते, जे मेकॅनिक होते. विनोद कांबळी हा सर्वसामान्य घरातील मुलगा होता. त्याने त्याचा बालपणीचा मित्र सचिनसोबत मुंबईच्या प्रसिद्ध कांगा लीगमध्ये पदार्पण केले. विनोद कांबळीची कारकीर्द जरी लहान असली तरी ती खूप विक्रमांनी भरलेली होती.


भिवंडीतील आकृती रुग्णालयात बर्थडे सेलिब्रेशन!


दरम्यान, विनोद कांबळीला चार दिवसांपूर्वी भिवंडीतील आकृती रुग्णालयात रुटीन तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. तपासणी दरम्यान त्याला अशक्तपणा वाटत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला रुग्णालयातच ठेवण्यात आले. सध्या त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून, डॉक्टरांनी उपचारांवर समाधान व्यक्त केले आहे.


दरम्यान काल वाढदिवसानिमित्त रुग्णालयात एक खास समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर, रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीवर्ग आणि विनोद कांबळी यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्यामध्ये त्याची पत्नी अँड्रिया हेविटशी, मुलगा येशू क्रिस्टिया आणि मुलगी दिसत आहे. यावेळी केक कापून आणि पुष्पगुच्छ तसेच फोटो फ्रेम देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विनोद कांबळी भावुक झाले आणि त्यांनी रुग्णालय प्रशासन तसेच त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले.


दोनदा केले लग्न 


विनोद कांबळीचे दोनदा लग्न झाले होते. ज्यामध्ये तिचे पहिले लग्न 1998 मध्ये नोएल लुईससोबत झाले होते. नोएला पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट होती. पण कांबळी यांचे प्रेम जीवन जास्त काळ टिकू शकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कांबळीने मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले. विनोद कांबळी यांना एक मुलगा येशू क्रिस्टियानो कांबळी आणि एक मुलगी आहे.


हे ही वाचा -


खास मैत्रिणीमुळे ओळख; क्रिकेटमुळे जुळून आलं; रिंकू सिंह-प्रिया सरोज एकमेकांच्या संपर्कात कसे आले?