Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी (Vinod Kambli Marathi News) यांचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर विनोद कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. क्रिकेटप्रेमींनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शैलेश ठाकूर यांचा दयाळूपणा आणि माजी खेळाडूबद्दलची आस्था यामुळे भिवंडीत क्रिकेटप्रेमींच्या मनात त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.


विनोद कांबळी कोणात्या आजाराशी झुंज देतोय?


रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर विवेक त्रिवेदी यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी दिसल्या. आता मंगळवारी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी असेही उघड केले की रुग्णालयाचे प्रभारी डॉ. एस सिंग यांनी कांबळीला आयुष्यभर मोफत उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. विनोद कांबळी यांची प्रकृती आता ठीक असल्याचं समोर आलं. तसेच विनोद कांबळींच्या मूत्राशयाला संसर्ग झाला असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आकृती रुग्णालयाचे डॉ. शैलेश सिंह ठाकूर यांनी दिली.


गेल्या काही वर्षांत बरीच प्रकृती खालावली-


विनोद कांबळी यांची प्रकृती गेल्या काही वर्षांत बरीच खालावली आहे. 2013 मध्ये त्यांच्यावर दोनदा हृदय शस्त्रक्रिया करावी लागली. त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याला आर्थिक मदत केली होती. या महिन्यात अनुभवी प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभाला कांबळी यांची ढासळती प्रकृती समोर आली. कार्यक्रमात सचिन तेंडुलकर कांबळीला भेटायला आला होता पण त्याला खुर्चीवरून उठणेही अवघड झाले होते. काही दिवसांपूर्वीच कांबळीने स्वतःला युरिनरी इन्फेक्शन झाल्याचा खुलासा केला होता. कपिल देव आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.




संबंधित बातमी:


Ind vs Aus Tanush Kotian: रविचंद्रन अश्विनची जागा मुंबईकराने घेतली; टीम इंडियात स्थान पटकावलं, कोण आहे तनुष कोटियन?