Vijay Hazare Trophy 2024-25 Semifinal : विजय हजारे ट्रॉफी 2024-25 आता अंतिम टप्प्यात आली आहे. हरियाणा, कर्नाटक, विदर्भ आणि महाराष्ट्र या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. विदर्भ संघाने राजस्थानला 9 विकेट्सने हरवून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. तर हरियाणाने गुजरात संघाला 2 विकेट्सने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.


पहिला उपांत्य सामना 15 जानेवारी रोजी हरियाणा आणि कर्नाटक यांच्यात खेळला जाईल. दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जाईल. दोन्ही उपांत्य सामने वडोदरा मैदानावर होतील. चारपैकी जो संघ उपांत्य सामना जिंकेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना 18 जानेवारी रोजी वडोदरा मैदानावर खेळवला जाईल.


विजय हजारे ट्रॉफी उपांत्य फेरीचे वेळापत्रक :


हरियाणा विरुद्ध कर्नाटक - 15 जानेवारी
विदर्भ विरुद्ध महाराष्ट्र - 16 जानेवारी


अंतिम सामना - 18 जानेवारी


विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांचे कर्णधार :


हरियाणा - अंकित कुमार
विदर्भ - करुण नायर
महाराष्ट्र - ऋतुराज गायकवाड
कर्नाटक - मयंक अग्रवाल




हरियाणाने गुजरातवर दोन विकेट्सनी मिळवला रोमांचक विजय


गुजरातविरुद्ध विजयासाठी ठेवलेले 197 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हरियाणाला खूप संघर्ष करावा लागला. गुजरातकडून हेमांग पटेलने सर्वाधिक 54 धावांचे योगदान दिले. त्याने 62 चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि पाच षटकार मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना हिमांशू राणाने 89 चेंडूत 66 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. 35 व्या ते 43 व्या षटकात 20 धावांत चार विकेट गमावल्यानंतर संघ अडचणीत आला होता, पण कंबोज याने 44 व्या षटकात षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. रवी बिश्नोईच्या शानदार गोलंदाजीमुळे हरियाणाला सामना जिंकण्यात अडचणी आल्या.


त्याआधी, गुजरातकडून हेमांग पटेलने अर्धशतक ठोकले, तो सोडला तर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. तथापि, इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित करणारा अक्षर पटेल या सामन्यात गुजरातसाठी फारसे योगदान देऊ शकला नाही. गुजरातच्या कर्णधाराने फक्त तीन धावा केल्या, पण त्याला एकही यश मिळवता आले नाही, त्याने 10 षटकांत 41 धावा दिल्या.


हे ही वाचा -


Australia Squad Champions Trophy 2025 : बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, पुढचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी,ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, कॅप्टनबाबत संभ्रम कायम