एक्स्प्लोर

VIDEO : वैभव सूर्यवंशी थेट तिलक वर्माशी भिडला, डोळ्यात डोळे घालून खुन्नस; अंपायरला करावा लागला हस्तक्षेप, नेमकं काय घडलं?

East Zone vs South Zone Final Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.

East Zone vs South Zone Final Duleep Trophy 2026 : दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ईस्ट झोनचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. सुरुवातीला मस्करी आणि स्लेजिंगच्या स्वरूपात सुरू झालेल्या संवादाने काही क्षणांतच वेगळं वळण घेतलं. दोघांमधील वाढता तणाव पाहून अखेर अंपायरला हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना वेगळं करावं लागलं. 

नेमकं काय घडलं? (Tilak Varma vs Vaibhav Sooryavanshi)

ही घटना ईस्ट झोनच्या डावातील 11व्या षटकात घडली. साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा सातत्याने वैभव सूर्यवंशीशी संवाद साधत होता. यावेळी तिलकने वैभवला त्याच्या उपकर्णधारपदावरून स्लेजिंग केलं. मात्र, काही क्षणांतच हा संवाद वादात बदलला. तिलक वर्मा वैभवच्या दिशेने पुढे आला आणि हाताने एक इशारा केल्याचं पाहायला मिळालं. त्यावर वैभवनेही मागे हटण्याऐवजी तिलकचा सामना केला. दोघांमधील तणाव वाढत असल्याचं लक्षात येताच अंपायरने तातडीने मध्ये येत दोघांना शांत केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा तांडव!

मैदानावर तिलक वर्मासोबत झालेल्या या वादाआधी वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिमन्यू ईश्वरनसोबत सलामीला आलेल्या वैभवने ईस्ट झोनला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 100 धावांची भागीदारी केली. वैभवने अवघ्या 37 चेंडूत 44 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, शॉर्ट-पिच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभवच्या बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला आणि तो मिड-विकेटच्या दिशेने हवेत गेला. डीप स्क्वेअर लेगवरून धावत आलेल्या तनय त्यागराजनने कोणतीही चूक न करता अप्रतिम झेल घेतला, आणि फायनलमध्ये 44 धावांवर वैभवचा डाव संपला 

उपांत्य फेरीत त्याने 92 आणि 40 धावांच्या खेळी केल्या होत्या. त्यानंतर फायनलमध्येही त्याने वेगवान फलंदाजी करत आपली छाप पाडली. आता दुलीप ट्रॉफीनंतर वैभव सूर्यवंशीचं लक्ष भारतीय संघासोबतच्या पुढील असाइनमेंटकडे असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभव खेळताना दिसण्याची शक्यता आहे. मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

हे ही वाचा -

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी शो! फायनलमध्ये मोहम्मद सिराजला धू धू धुतला, एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या, पण शेवटी नको ते घडलं

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav News : मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
Mumbai Indians IPL 2027 : रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z
Rohit Sharma Captain MI IPL 2027 : मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
मुंबईच्या गादीवर पुन्हा हिटमॅन! कर्णधार बनताच रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया! सूर्यकुमारचीही 3 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Advertisement

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जायचं ठरलं, रोहित पवारांच्या कट्टर समर्थकाची सूचक पोस्ट, चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP on Delimitation : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सगळेच दोर कापले, निलेश लंकेंनी ऐनवेळी निर्णय बदलला, एकही खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नाही
Embed widget