IND vs AUS, LIVE Score : रोहित शर्मा 35 धावा करुन बाद, शुभमनचं अर्धशतक पूर्ण

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. मालिकाविजयासाठी भारताला हा सामना जिंकणं अनिवार्य आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Mar 2023 11:12 AM

पार्श्वभूमी

Australia tour of India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होत आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे आहे. पण तरी मालिकाविजयासाठी आजचा विजय भारतीय संघासाठी अनिवार्य आहे. आता हा चौथा सामना जिंकून भारतीय संघ पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे भारतीय संघाने वर्षाची सुरुवात अगदी दमदार पद्धतीनं केली आहे. श्रीलंकेवर मालिका विजयानंतर न्यूझीलंडलाही एकदिवसीय आणि त्यानंतर टी20 मालिकेत भारतानं विजय मिळवला. ज्यानंतर आता दमदार अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिका विजय मिळवण्याची संधी भारताकडे आहे. कारण मालिकेतील पहिले दोन्ही सामना भारताने जिंकले आहेत. तिसरा सामना गमावल्यामुळे भारताला आता मालिकाविजयासाठी आजचा विजय अनिवार्य आहे. आजचा सामना जिंकून भारत मालिका 3-1 जिंकू शकतो तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   



भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head






भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 105 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 


WTC Final मध्ये एन्ट्रीसाठी भारताला विजय महत्त्वाचा


आजची कसोटी जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करेल. सध्या, टीम इंडिया 60.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया 68.52 विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर असून WTC फायनलमध्ये पोहोचली आहे.


कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय सामने

 

कसोटी सामन्यानंतर (Test Match) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामने (ODI Match) खेळवले जाणार आहेत. लवकरच एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष्य देत असल्याने ही मालिकाही पाहण्याजोगी असणार आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)









































सामनातारीखठिकाण
दुसरा कसोटी सामना17-21 फेब्रुवारी 2023दिल्ली
तिसरा कसोटी सामना1-5 मार्च 2023 धर्माशाला
चौथा कसोटी सामना9-13 मार्च 2023 अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना17 मार्च 2023 मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना19 मार्च 2023 विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना22 मार्च 2023 चेन्नई







हे देखील वाचा-



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.