Under-19 WC 2022 Semifinal: भारताचा अंडर 19 संघ (U19 Team India) सध्या सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषकात (Under 19 World Cup) अप्रतिम कामगिरी करत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी भारतानं सुरु ठेवली आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गतविजेत्या बांग्लादेशचा पाच विकेट्सनी पराभव केला. सामन्यात भारताने आधी भेदक गोलंदाजी करत बांग्लादेशला 111 धावांत सर्वबाद करत 112 धावांचं आव्हान 31 षटकांत पूर्ण केलं. दरम्यान आता सेमीफायनच्या सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघही बलाढ्य पाकिस्तानला नमवून सेमीफायनलमध्ये आला आहे. त्यामुळे सेमीफायनलचा हा सामना अतिशय रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. 


कुठे खेळवला जाणार सामना?


हा सामना ऑस्ट्रेलियातील अंटीगा येथील कूलीज क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे.


कधी खेळवला जाणार सामना?


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलचा हा सामना उद्या अर्थात 2 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाणार आहे. 


2022 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास


भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, संघाच्या बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ म्हणून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यादरम्यान धुळच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha