Team India T20 Sqaud : दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 जूनपासून भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) यांच्यातील 5 टी20 सामन्यांसाठी बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली. यावेळी आयपीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर संघ तयार झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आयपीएल 2022 मध्ये दमदार गोलंदाजी कऱणाऱ्या उमराननला यावेळी संधी मिळाली आहे. याशिवाय अर्शदीपलाही भारतीय संघाचं तिकीट मिळालं आहे.  

उमरानची आयपीएल 2022 मधील कामगिरी 

आयपीएल 2022 मध्ये उमरानने त्याच्या तुफान वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं. त्याने गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल 5 गडी बाद करत विशेष कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सामना गमावलेल्या हैदराबाद संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यावेळी उमरानने 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. हंगामातील 14 सामन्यात उमरानने 21 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीतही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर 5 मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल 157 किमी प्रतितासानं चेंडू टाकत उमराननं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. दुसरीकडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या अर्शदीपने यंदा 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उम्रान मलिक.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 9 जून अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
दुसरा टी20 सामना 12 जून बाराबती स्टेडियम, कट्टक
तिसरा टी20 सामना 14 जून डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम
चौथा टी20 सामना 17 जून सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट
पाचवा टी20 सामना 19 जून एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु

हे ही वाचा -