U19 World Cup 2024 Final: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) जवळपास 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा अंतिम सामना (IND vs AUS Final Match) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अंडर 19 वर्ल्डकप 2024 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (Team India vs Australia) यांच्यात खेळवला जाणार आहे. पुन्हा एकदा 140 कोटी भारतीयांचं लक्ष टीम इंडियाच्या विजयाकडे लागलं आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाचा कांगारूंकडून झालेला पराभव आणि त्यानंतर रोहित (Rohit Sharma), विराट, शामी, राहुलच्या डोळ्यांत तराळलेले अश्रू यां सगळ्याचा वचपा काढण्यासाठी आज उदयसेना मैदानात उतरणार आहे. कांगारूंना चीतपट करुन विश्वचषक उंचावण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे.
भारताच्या युवा संघाचा कर्णधार उदय सहारन आणि मुशीर खान यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाचा पराभव झालेला. मात्र आता 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावण्याची संधी भारतीय युवा क्रिकेट संघाकडे आहे.
कर्णधार उदय सहारन जबरदस्त फॉर्मात
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत उदय सहारन अव्वल आहे. त्यानं 6 सामन्यांत 389 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली आहेत. उदय सहारन मधल्या फळीत फलंदाजीला येतो आणि आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतो. उदयनं आयर्लंडविरुद्ध 75 धावांची शानदार खेळी केली. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 81 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महाअंतिम सामन्यात उदय कांगारूंना धूळ चारणार हे मात्र नक्की.
मुशीर खानच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी
सेमीफायनलमध्ये मुशीरला विशेष काही करता आलेलं नाही. तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. मात्र सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुशीरनं 6 सामन्यांत 338 धावा केल्या आहेत. या काळात त्यानं 2 शतकंही झळकावली आहेत. मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खान हा सिनियर टीम इंडियाचा भाग आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे.
कांगारूंचा कस लागणार
टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कस लागणार आहे. टीम इंडियाचे धुरंधर कांगारूंना धूळ चारण्यासाठी आणि वर्ल्डकप 2023 च्या फायनलचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 1 गडी राखून पराभव केला होता. हा सामना अतिशय रोमांचक होता. हॅरी डिक्सननं त्यासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. हॅरीनं 6 सामन्यांत 267 धावा केल्या आहेत.
अंतिम फेरीत टीम इंडियाचाच वरचष्मा
अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन लढती झाल्या आहेत. दोन्ही वेळा भारतीय क्रिकेट संघानं शानदार विजय मिळवत कांगारूंना धूळ चारली आहे. आता तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दोन्ही संघांमध्ये टक्कर होणार आहे. जर भारतीय संघ जिंकला तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये विजयाची हॅट्रीक होईल. याआधी भारतीय क्रिकेट संघानं 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. इंग्लंडचा पराभव करून टीम इंडियानं गेल्या विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
टीम इंडियानं 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे. भारतीय संघाची नजर सहाव्यांदा विजेतेपदावर आहे. भारतानंतर, ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक तीन वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. 1998, 2002 आणि 2010 च्या मोसमात त्याने हे विजेतेपद पटकावले आहे. त्याला दोनदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. या दोन्ही वेळा भारतीय क्रिकेट संघानं कांगारूंचा पराभव केला होता. याशिवाय पाकिस्ताननं दोन वेळा, तर बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा विजय मिळवला.
अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा रेकॉर्ड
2000 सीझन Vs श्रीलंका : 6 विकेट्सनी विजय
2008 सीझन Vs साउथ अफ्रीका : 12 रन्सनी विजय
2012 सीझन Vs ऑस्ट्रेलिया : 6 विकेट्सनी विज
2018 सीझन Vs ऑस्ट्रेलिया : 8 विकेट्सनी विज
2022 सीझन Vs इंग्लैंड : 4 विकेट्सनी विज
अंडर-19 भारतीय संघ : उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश राव (विकेटकीपर), सौमी कुमार पांडे (उपकर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.
अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा संघ : हॅरी डिक्सन, सॅम कोनस्टास, ह्यू वीबगेन (कर्णधार), हरजस सिंह, रयान हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ओलिवर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्राकर, महली बियर्डमॅन, कॅलम विडलर, लाचलान एटकेन, चार्ली एंडरसन, हरकीरत बाजवा, एडन ओ कॉनर.
महत्त्वाच्या इतर बातम्या :