Cricket News : क्रिकेटमधील रेकॉर्ड अनेकदा चकीत करणारे असतात. अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवलंय. मात्र कारकिर्दित अनेक खेळाडूंच्या नावे नको असलेल्या रेकॉर्ड्सी नोंद देखील झाली आहे. क्रिकेटमध्ये खेळाडूंची तुलना केली तर फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व गाजवलं. मात्र काही फलंदाजांच्या नावे असेही काही रेकॉर्ड नोंदवले गेले ज्यांचा त्यांनी कधी विचारही नसेल केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या पहिल्या पाच फलंदाजांची माहिती घेऊयात.
सनथ जयसूर्या
सनथ जयसूर्या श्रीलंका क्रिकेट इतिहासातील एक महान फलंदाज. जयसूर्याने अनेक गोलंदाजांना घाम फोडला आहे. मात्र एकदिवसीय कारकिर्दीतील 445 सामन्यात तो 34 वेळा खातं न उघडता तंबूत परतला आहे. मात्र या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 13,430 धावांची नोंद आहे.
शाहिद आफ्रिदी
सर्वात जलद शतक झळकावल्याचा रेकॉर्ड काही काळ आपल्या नावे आसणाऱ्या आणि जागतिक क्रिकेटमध्ये बूम बूम म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिदआफ्रिदी या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. 398 एकदिवसीय सामन्यात 6892 धावा करणारा आफ्रिदी कारकीर्दीत 30 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
वसीम अक्रम आणि महेला जयवर्धने
पाकिस्तानच्या माजी कर्णधार वसीम अक्रम आणि श्रीलंकेला आपल्या नेतृत्वात 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचवणारा महेला जयवर्धने हे दोन्ही खेळाडून आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 28-28 वेळा शुन्यावर बाद झाले आहेत. वसीम अक्रम गोलंदाजीत माहीर होता. मात्र जगातील दिग्गज फलंदाजांच्या यादीत असलेला जयवर्धने देखील या यादीमध्ये आहे.
लसिथ मलिंगा
मैदानात अनेक फलंदाजांची दांडी गुल करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकिर्दित लसिथ मलिंगा 26 वेळा शुन्यावर बाद झाला आहे.