Continues below advertisement

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला येथे रविवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा फलंदाज तिलक वर्मानं पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यानं संघ व्यवस्थापनाच्या फलंदाजी क्रमातील लवचिकतेच्या धोरणाचं समर्थन केलं. संघातील बहुतांश फलंदाज मॅचमधील परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार असल्याचं तिलक वर्मा म्हणाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.

Tilak Varma : तिलक वर्मा काय म्हणाला?

भारतानं आगामी टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून मधल्या फळीत फलंदाजी क्रमातील प्रयोग सुरु ठेवले आहेत. मर्यादित सामन्यांच्या फॉरमॅटमध्ये तुम्ही गोष्टी स्वीकारणं महत्त्वाचं असतं, असं तिलक वर्मा म्हणाला. दोन्ही सलामीवीर सोडून प्रत्येक जण फलंदाजी क्रमाबाबत लवचिक आहे. मी 3,4,5,6, किंवा टीम ज्या फलंदाजी क्रमाला प्राधान्य देईल त्या स्थानावर फलदाजी करण्यास तयार आहे, असं तिलक वर्मानं म्हटलं. टीमला वाटलं की हा पर्याय बेस्ट असेल तर प्रत्येक जण टीमच्या भूमिकेबरोबर असतो, असं तिलक वर्मा म्हणाला.

Continues below advertisement

तिलक वर्मानं काही निर्णय हे परिस्थिती पाहून घेतलेले असतात जे भूमिका आधारित नसतात. अक्षर पटेल यानं तिसऱ्या स्थानावर चांगली फलंदाजी केलेली आहे. ते परिस्थितीवर अवलंबून असतं. यासाठी तिलक वर्मानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये काही प्रयोग यशस्वी ठरल्याचं देखील सांगितलं.

धर्मशालामधील स्थितीबाबत बोलताना तिलक वर्मा म्हणाला की थंड वातावरण असलं तरी खेळपट्टी फलंदाजीसाठी फायदेशीर ठरेल. या ठिकाणी अंडर 19 मालिका भारताकडून खेळल्याचं तिलक वर्मानं सांगितलं. आम्ही खेळपट्टी पाहिली असून मॅच हाय स्कोरिंग असेल, असंही तो म्हणाला. कमी तापमानामुळं थोडी मदत गोलंदाजांना सुरुवातीला मिळेल, असंही तिलक वर्मा म्हणाला.

भारतीय संघ मानसिकदृष्ट्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे. नाणेफेक आमच्या हातात नाही. आम्ही दव पडेल त्याच्या परिणामासाठी सज्ज आहोत, ओल्या बॉलनं सराव केल्याचं देखील तिलक वर्मानं सांगितलं. मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. इथं खूप थंडी असली तरी आम्ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्टाय सज्ज असल्याचं तिलक वर्मानं म्हटलं. जे मानसिकदृष्ट्या भक्कम असतात ते कुठेही यश मिळवू शकतात.

तिलक वर्मानं फलंदाजीतील क्रमातील बदलाचा मॅचच्या तयारीवर परिणाम होत नसल्याचं म्हटलं. सरावसत्रात आम्ही बेसिक्स फॉलो करतो. टीमसाठी काय करता येईल हा नेहमी विचार करतो, असं वर्मानं म्हटलं. पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा फलंदाजी करणं फारसं परिणामकारक ठरत नाही. पहिल्या दोन मॅचमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणारे संग जिकंले कारण थंडीमुळं सीम आणि स्विंग होता. तिलक वर्मानं आक्रमक रणनीतीवर कायम राहणार असल्याचं सांगितलं. गेल्या 15-20 मॅचमध्ये ज्या इंटेंटनं खेळलो होतो त्यानुसार खेळणार आहोत. आम्हीच टी 20 मालिका जिंकू, असा विश्वास तिलक वर्मानं व्यक्त केला.