Ultimate Test Records: आजकाल टेस्ट क्रिकेटमध्येही ऋषभ पंत सारखे फलंदाज स्फोटक खेळ दाखवतात. त्यामुळे आजकाल कसोटी क्रिकेटमध्येही षटकार, चौकारांचा पाऊस पडतो. पण एक काळ असा होता जेव्हा भेदक गोलंदाजांसमोर फलंदाज अगदी शांतपणे खेळत. त्यात असेही काही गोलंदाज झाले आहेत, ज्यांनी जवळपास 5000 चेंडू फेकले पण त्यांच्या एकाही चेंडूवर फलंदाजाला षटकार ठोकता आला नाही. अशाच पाच गोलंदाजांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


1. किथ मिलर (Keith Miller): ऑस्ट्रेलियाचा महान ऑलराउंडर असणाऱ्या किथ यांनी 1946 मध्ये टेस्ट डेब्यू केला होता. त्यांनी 55 टेस्ट सामन्यात 22.97 च्या सरासरीने 170 विकेट मिळवले. त्यांनी कारकिर्दीत 10 हजार 461 चेंडू फेकले पण एकदाही त्यांना षटकार पडला नाही.


2. नील हॉक (Neil Hawke): ऑस्ट्रेलियाचेच खेळाडू असणारे नील हॉक यांनीही 1963 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. 27 टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 29.41 च्या सरासरीने 91 विकेट्स घेतले यावेळी 6 हजार 987 चेंडू त्यांनी फेकले पण त्यांच्या एकाही चेंडूवर फलंदाजाला षटकार ठोकता आला नाही.


3. मुदस्सर नजर (Mudassar Nazar): पाकिस्तानचे खेळाडू असणारे नजर 1976 ते 89 पर्यंत 76 टेस्ट मॅच खेळले. त्यांनी 5 हजार 967 चेंडू फेकत 66 विकेट्स घेतले पण एकदाही षटकार त्यांच्या ओव्हरमध्ये पडला नाही.


4. महमूद हुसैन (Mahmood Hussain): महमूद हुसैन हे देखील पाकिस्तानी खेळाडू होते. 1952 मध्ये भारताविरुद्ध कसोटी डेब्यू करणाऱ्या महमूद यांनी 27 टेस्ट सामन्यात 38.84 च्या सरासरीने 68 विकेट्स घेतले. 5 हजार 910 चेंडू फेकले असून एकदाही त्यांना षटकार पडला नाही.


5. डेरेक प्रिंगल (Derek Pringle):  इंग्लंडचे गोलंदाज डेरेक यांनी 30 कसोटी सामन्यात 5 हजार 287 चेंडू फेकले पण त्यांच्यासमोर फलंदाजाला एकही षटकार लगावता आला नाही. त्यांनी कसोटीमध्ये 70 विकेट्स ही घेतले आहेत.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha