Team India for ICC T20 World Cup : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघ देखील जाहीर केला आहे. रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. जाडेजा आणि बुमराह हे दिग्गज दुखापतीमुळे संघात नसले तरी बरेच कर्तबगार युवा खेळाडू संघात असल्याने भारताला विजयाची आशा आहे. या खेळाडूंवरही खास जबाबदारी असणार असून विशेष म्हणजे 5 असे खेळाडू आहेत. जे पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार आहेत.


1. युजवेंद्र चहल : या यादीत पहिलं नाव आहे, भारताचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलचं. भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या चहलला अजूनपर्यंत संधी मिळालेली नाही. 2016 पासून तो या प्रतिक्षेत असून आता फायनली तो विश्वचषक खेळणार आहे.


2.अक्षर पटेल : अष्टपैलू अक्षर पटेल यालाही एक फिरकीपटू अष्टपैलू म्हणून रवींद्र जाडेजाच्या जागी संधी मिळाली आहे. त्यानेही अलीकडच्या काही सामन्यात कमाल कामगिरी केल्याने त्याच्याकडूनही बऱ्याच अपेक्षा संघाला असणार आहेत.


3. हर्षल पटेल: आयपीएलमध्ये चमकदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियात आलेल्या मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षलकडे डेथ ओव्हर्स तसंच मिडल ओव्हरसमध्ये गोलंदाजी करण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.


4. अर्शदीप सिंह: एक लेफ्ट हँडर वेगवान गोलंदाज म्हणून युवा अर्शदीपला संघात घेतलं आहे. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी भारताची कमकुवत बाजू असून ही मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम अर्शदीपकडे असणार आहे.


5. दीपक हुडा: युवा खेळाडू दीपक हुडानेही काही काळापूर्वीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं असून आतापर्यंत कमाल कामगिरी केली आहे. त्यामुळे तो विश्वचषकात सिलेक्ट झाला असून त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळाल्यास त्याच्याकडून संघाला बऱ्याच अपेक्षा असतील.


T20 World Cup साठी भारतीय संघ जाहीर


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले होते. पण बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेला मुकणार आहे. दुसरीकडे अर्शदीपला एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...


टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह (दुखापतीमुळे माघार), हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.


राखीव खेळाडू


मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर


हे देखील वाचा-