IND vs NZ: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाची न्यूझीलंडकडून बॅटिंग; भारतानं 1-0 नं मालिका गमावली
IND vs NZ ODI Series 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द घोषित करण्यात आलाय.
IND vs NZ ODI Series 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द घोषित करण्यात आलाय. क्राइस्टचर्चमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. यासह यजमान संघ न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं विजय मिळवला.
ट्वीट
The third & final #NZvIND ODI is called off due to rain 🌧️
— BCCI (@BCCI) November 30, 2022
New Zealand win the series 1-0.
Scorecard 👉 https://t.co/NGs0HnQVMX #TeamIndia
📸 Courtesy: Photosport NZ pic.twitter.com/73QtYS5SJm
न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचं लोटांगण
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत पूर्णपणे अपयशी ठरले. वॉशिंग्टन सुंदरची अर्धशतकी खेळी (51 धावा) आणि श्रेयस अय्यरनं 49 धावांची खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडसमोर सर्वबाद 219 धावा केल्या. न्यूझीलंडकडून अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, टीम साऊथीनं दोन विकेट्स घेतल्या. लॉकी फॉर्गुसन आणि मिचेल सँटनर यांच्यात खात्यात एक-एक विकेट्स जमा झाली. भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघानं 19व्या षटकात एक विकेट गमावून 104 धावा केल्या असताना पावसानं हजरे लावली.
पावसाची न्यूझीलंडकडून बॅटिंग
कर्णधार केन विल्यमसननं या मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात टॉस जिंकला. न्यूझीलंडनं तिन्ही सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पावसानं भारताचं टेन्शन वाढवलं. दुसरा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, पावसामुळं तिसराही सामना रद्द करण्यात आला आणि मालिकेचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूनं लागला.
भारताचा बांगलादेश दौरा
न्यूझीलंडनंतर भारतीय संघ बांगलादेश दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. येत्या 4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. त्यानंतर 14-18 डिसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-