एक्स्प्लोर

Team India WTC Final Scenario : श्रीलंकेने टीम इंडियाच्या विजयाचा घास हिरावला; भारत आता WTC च्या फायनलमध्ये कसा पोहोचणार?, चक्रावून टाकणारं समीकरण

Team India WTC Final Scenario Update : भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

Team India WTC 2025-27 Points Table Final Scenario : श्रीलंका विरुद्धचा कोलंबो येथील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यजमान संघाला यश आल्यामुळे भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 2 सामन्यांची मालिका 1-0 अशी आपल्या नावावर केली असली, तरी दुसऱ्या सामन्यातील ड्रॉमुळे भारताचा निसटता विजय हातातून निघून गेला.

WTC गुणतालिकेत पाचवे स्थान कायम, पण टक्केवारीत मोठा फटका

दुसरा सामना जिंकला असता तर भारत 60  टक्केवारीच्या पार जाऊन संघ थेट चौथ्या स्थानावर पोहोचला असता. मात्र, सामना अनिर्णित राहिल्यामुळे भारताची टक्केवारी ही 53.33 वरून 51.51 वर आली. गुणतालिकेत भारतीय संघ अजूनही पाचव्या स्थानावरच अडकला आहे. या चक्रात भारताचे आता एकूण 7 सामने बाकी आहेत आणि 2 सामने न्यूझीलंडविरुद्ध आणि 5 सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

फायनलमध्ये पोहोचण्याचे गुंतागुंतीचे समीकरण

ड्रॉमुळे टीम इंडियाच्या डब्ल्यूटीसी (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या संधीला निश्चितच धक्का बसला आहे. पण, संघाला अजूनही अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्याकरिता किमान 60% पीसीटी आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळवणे अशक्य होईल. पण, 60% गुण देखील कमी असू शकतात, कारण पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाची 80% आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची 75% शक्यता आहे.

भारताला काय करावे लागेल?

फायनलचे तिकीट पक्के करण्यासाठी भारताला उर्वरित सर्व 7 सामने जिंकणे आवश्यक आहे. जर संघाने 7 पैकी 7 सामने जिंकले, तरच भारत अंतिम फेरीत पोहोचण्याचा दावा भक्कम करू शकेल. एखादा सामना गमावणे किंवा अनिर्णित राहणे भारताला स्पर्धेतून बाहेर करू शकते. 

मागील डब्ल्यूटीसी (WTC) चक्रात, म्हणजेच 2023-25 मध्ये टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरली होती. त्यापूर्वी, ते दोन्ही चक्रांमध्ये अंतिम फेरीत पोहोचले होते. पहिल्या चक्रात न्यूझीलंडविरुद्ध आणि दुसऱ्या चक्रात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना विजेतेपद गमवावे लागले.

हे ही वाचा -

IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरचा तो निर्णय चुकला अन्... टीम इंडिया कोलंबोत विजयापासून दूर का राहिली?, 3 प्रमुख कारणं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
युझवेंद्र चहलने रचला इतिहास! असा पराक्रम करणारा तो ठरला पहिलाच गोलंदाज, नेमका काय आहे विक्रम? 
IND vs NZ : मोहम्मद सिराजला पहिल्या कसोटीबाहेर ठेवल्यानं माजी क्रिकेटपटूंची टीकेची झोड, अखेर टीम इंडियाच्या प्रशिक्षकानं उत्तर दिलं...
भारताची दमदार सुरुवात पण न्यूझीलंडचा पलटवार, सिराजला संघाबाहेर ठेवल्यानं वादाचा भडका, भारताचा कोच म्हणाला...
Asia Cup Rising Stars 2026: आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
आशिया कपचा थरार आजपासून! वैभव-अभिषेकचा धुमाकूळ पाहायला मिळणार, IND vs PAK महामुकाबला कधी? टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर
IND vs NZ 1st Test Day-1 : पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
पंतने दिला इशारा, पडिक्कलने हातात आलेला झेल सोडला! निकोल्सला जीवदान, शुभमन गिल भडकला; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget