IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा T20 सामना बे ओव्हल येथे खेळवला गेला. सामना भारताने 65 धावांनी जिंकला असून सामना पूर्ण होण्याआधीच भारताने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला. सामन्यात नाणेफेक होताच भारतीय संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक सामने भारत खेळला.


भारतीय संघ या कॅलेंडर वर्षातील आपला 62 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि यासह भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी 2009 मध्ये 61 सामने खेळले होते. हे दोन संघ सोडले तर आतापर्यंत इतर कोणत्याही संघाला एका कॅलेंडर वर्षात 60 सामनेही खेळता आलेले नाहीत. यापूर्वी, भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 55 सामने 2007 मध्ये खेळले होते. यंदा भारताने 39 टी-20 सामना खेळले आहेत. त्यापैकी 28 मध्ये त्यांना विजय आणि 10 मध्ये पराभवाचा सामना केला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही आणि तो सामना या न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना होता. जो पावसामुळे रद्ध झाला. याशिवाय भारतीय संघाने या वर्षात 18 एकदिवसीय सामनेही खेळला आहे, त्यापैकी 13 जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. या वर्षी भारत फक्त पाच कसोटी सामने खेळला आहे. त्यापैकी दोनमध्ये भारताने विजय आणि तीनमध्ये पराभवाचा सामना केला आहे. 


सामन्याचा लेखा-जोखा


नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने नाबाद 111 धावा केल्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे आव्हान ठेवले. पण 18.5 षटकांत न्यूझीलंडला टीम इंडियानं सर्वबाद केलं आणि सामना 65 धावांनी भारतानं जिंकला. दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान या सामन्यात भारताने विजय मिळवल्यामुळे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान आता मंगळवारी तिसरा सामना खेळवला जाणार असून भारताने तो जिंकल्यास मालिकाही भारत जिंकल, तसंच न्यूझीलंडने सामना जिंकल्या मालिका अनिर्णीत सुटणार आहे. 


हे देखील वाचा-