हरारे :  झिम्बॉब्वे आणि भारत (ZIM vs IND) यांच्यातील पाचव्या टी 20 मॅचमध्ये सिकंदर रझानं (Sikandar Raza) टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिकंदर रझानं पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालला बाद करुन आपला निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. मात्र, रियान पराग, संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शिवम दुबे यांच्या संयमी आणि आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं झिम्बॉब्वे पुढं विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं.  भारतीय संघानं 6 विकेटवर 167 धावा केल्या.

  


शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांच्या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वालनं आक्रमक सुरुवात करत सिकंदर रझाला दोन षटकार मारले. यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये सिकंदर रझानं यशस्वी जयस्वालला बाद केलं. यशस्वी जयस्वाल 12 धावांवर बाद झाला.  यानंतर अभिषेक शर्मा देखील आक्रमक फलंदाजी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतराला होता. अभिषेक शर्मा 14 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताला शुभमन गिलच्या रुपात तिसरा धक्का बसला. कॅप्टन शुभमन गिल केवळ 13 धावा करु शकला. 


संजू सॅमसन आणि रियान परागनं डाव सावरला


भारताच्या तीन विकेट 40 धावांवर गेल्या होत्या. भारतीय संघ बॅकफूटवर आलेला असतानाच संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी 65 धावांची भागिदारी करत डाव सावरला. रियान पराग 22 धावा करुन बाद झाला. यानंतर शिवम दुबे मैदानात फलदाजीसाठी आला. दुसरीकडे उपकॅप्टन संजू सॅमसन यानं अर्धशतक पूर्ण केलं. संजूच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं सन्मानजनक धावसंख्या उभारली. संजू सॅमसन फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात 58 धावांवर बाद झाला. संजू सॅमसननं चार षटकार आणि एक चौकार मारला. संजू सॅमसन याचं हे  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं अर्धशतक ठरलं. 


संजू सॅमसन बाद झाल्यानंतर  शिवम दुबेनं फटकेबाजी केली. शिवम दुबेच्या या कामगिरीच्या जोरावर भारतानं 150 धावांचा टप्पा पार केला. शिवम दुबेनं 26 तर रिंकू सिंगनं 11 धावा केल्या.


झिम्बॉब्वेच्या सिकंदर रझानं एक विकेट घेतली. तर, मुझरबानी यानं दोन विकेट घेतल्या. नागरवा आणि ब्रँडन मावुता यांनी प्रत्येकी एक विकेट घेत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.  झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रमाणं श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी सरस ठरली होती. त्या प्रमाणं आज देखील त्यांनी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. 


झिम्बॉब्वे मालिकेत कमबॅक करणार? 


भारतानं मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतलेली आहे. झिम्बॉब्वेकडून आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत मालिकेचा शेवट चांगला करण्याचा प्रयत्न असेल. 


संबंधित बातम्या : 


IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात केएल राहुलसह श्रेयस अय्यरचं कमबॅक? वनडे मालिकेत रोहित शर्मा अन् विराट कोहलीचं काय?


IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्यात बदल, बीसीआयकडून मोठी अपडेट,जाणून घ्या नवं वेळापत्रक