India v Pakistan in T20 World Cup 2024: गतवर्षात एकदिवसीय विश्वचषकात (T20 World Cup 2024) कांगारूंनी टीम इंडियाचा (Team India) पराभव केला अन् देशातील 140 कोटी जनतेच्या भावनांचा चक्काचूर झाला. पण, यंदाच्या नव्या वर्षात गेल्या वर्षाची जखम भरुन काढण्याची टीम इंडियाकडे मोठी संधी आहे. 2024 मध्ये टी20 विश्वचषक (World Cup 2024) पार पडणार आहे. त्यामुळे या नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.


यावर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जूनमध्ये खेळवला जाणार आहे. टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूत्रांच्या हवाल्यानं भारतीय क्रिकेट संघाचं टी20 वर्ल्डकपमधील शेड्यूल समोर आलं आहे. या शेड्युलनुसार, टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला क्रिकेट सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळवला जाऊ शकतो. तिसरा सामना 12 जूनला अमेरिकेविरुद्ध होणार आहे. हे तीन सामने न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. दरम्यान, टी-20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. 


सूत्रांच्या म्हणण्यानुसार, टीम इंडियाचं शेड्यूल कसं असेल? 



  • 5 जून : टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क 

  • 9 जून : टीम इंडिया VS पाकिस्तान, न्यूयॉर्क 

  • 12 जून : टीम इंडिया VS अमेरिका, न्यूयॉर्क 

  • 15 जून : टीम इंडिया VS कॅनडा, फ्लोरिडा 

  • 20 जून : टीम इंडिया Vs सी-1 (न्यूझीलंड) बारबाडोस 

  • 22 जून : टीम इंडिया Vs श्रीलंका, एंटीगुआ 

  • 24 जून : टीम इंडिया Vs ऑस्ट्रेलिया, सेंट लूसिया

  • 26 जून : पहली सेमीफायनल, गयाना 

  • 28 जून : दुसरी सेमीफायनल, त्रिनिदाद 

  • 29 जून : फायनल, बारबाडोस


2024 मध्ये खेळला जाणारा हा टी20 विश्वचषक युनायटेड स्टेट्स आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाईल. हा विश्वचषक जून आणि जुलै 2024 मध्ये खेळवला जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने (ICC) आतापर्यंत इतकीच माहिती या विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल समोर आणली आहे. दरम्यान या टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक आणि वेळेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण हे नक्की आहे की 2024 च्या T20 विश्वचषकात होणारे सामने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवले जातील. आगामी विश्वचषकात एकूण 45 सामने होणार असून त्यातील एक तृतीयांश सामने अमेरिकेत आणि बाकीचे वेस्टइंडिजमध्ये खेळवले जातील.


कोणते संघ ठरले पात्र?


ICC T20 क्रमवारीतील अव्वल-10 संघ वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. यानंतर पात्र संघ या विश्वचषकाचा भाग असतील. सध्या भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत. हे सर्व संघ आयसीसी टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. याशिवाय उर्वरित पात्रता संघ या विश्वचषकात खेळणार आहेत.