India vs England : भारतीय संघ (Team India) सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून या पहिला कसोटी सामना नुकताच भारताने गमावला आहे. पण अजूनही एकदिवसीय आणि टी20 अशा दोन मालिका शिल्लक आहेत. यातील तीन टी20 सामन्यांना 7 जुलैपासून सुरुवात होणार असून खेळाडू सरावासाठी मैदानात पोहोचले देखील आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यावेळी इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात कसोटी सामन्यात सहभागी खेळाडू खेळणार नसून नंतरच्या दोन्ही टी20 सामन्यात निवडक खेळाडूंना संधी मिळाली आहे.

  

 

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी20 साठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 साठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक

कसं असेल भारताचं इंग्लंडविरुद्धचं टी20 सामन्यांचं वेळापत्रक?

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

हे देखील वाचा-