Team India Squad : विश्वचषकासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही संघाची घोषणा, शमीचं पुनरागमन
Team India : टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी20 सामने खेळणार आहे. यासाठी संघाची घोषणा नुकतीच बीसीसीआयने केली आहे.
Team India for Australia and South Africa T20Is : आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी (ICC T20 World Cup) भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामना खेळणार आहे. हे दोन्ही संघ भारत दौऱ्यावर (South Africa and Australia Tour of India 2022) येणार आहेत. यावेळी आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी20 सामने खेळण्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. दरम्यान बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी नुकतीच संघाची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे अनुभवी मोहम्मद शमी संघात परतला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
टी20 विश्वचषकापूर्वी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार असून यावेळी सर्वात आधी भारत टी20 मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात सामने खेळण्यासाठी येणार आहे. 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या सामन्यांसाठी भारताने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी20 विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या संघातील खेळाडूच या संघात असून राखीव खेळाडूंची नावंही संघात आहेत. दरम्यान अंतिम 11 मध्ये कोणा-कोणाला संधी मिळेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तर नेमका कसा आहे संघ पाहूया...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी-20 सामना | 20/09/2022 | ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम | संध्याकाळी 7.30 वा |
दुसरा टी-20 सामना | 23/09/2022 | विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, महाराष्ट्र | संध्याकाळी 7.30 वा |
तिसरा टी-20 सामना | 25/09/2022 | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद | संध्याकाळी 7.30 वा |
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार टी20 आणि एकदिवसीय सामने
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 2 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला खेळला जाईल. यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल, जी 11 ऑक्टोबरपर्यंत खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी.
वरील दोन्ही दौऱ्यासाठीच्या संघामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्शदीप तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार्दीक आणि भुवनेश्वर संघात नसल्याचं दिसून आले आहे. हे तिघेही या मालिकादरम्यान नॅशनल क्रिकेट अकादमीत काही कामानिमित्त असणार असल्याचंही बीसीसीआनं कळवलं आहे.
टी20 विश्वचषकासाठीही भारतीय संघ जाहीर
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
हे देखील वाचा-