ICC Test Rankings Update 2025 : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला आहे. सेंच्युरियनमधील पहिला सामना दोन गडी राखून जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवासह टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या सर्व मालिकेमुळे आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय संघाची मोठी घसरण झाली आहे.  




पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाचे नुकसान 


भारतीय संघ दीर्घकाळापासून आयसीसी कसोटी क्रमवारीत वर्चस्व गाजवत होता, मात्र गेल्या काही सामन्यातील पराभवांमुळे टीम इंडियाचे रेटिंग घसरले आहे. टीम इंडिया आता 109 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती. मालिका संपल्यानंतरही टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती, पण दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करताच त्यांचे रेटिंग पॉइंट भारतापेक्षा सरस झाले. त्यामुळे तो 112 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या संघाचे 126 रेटिंग गुण आहेत.




भारतही WTC फायनलमधून बाहेर


ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाला केवळ क्रमवारीतच फटका बसला नाही. तर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ही फायनल 11 जूनपासून खेळवली जाणार आहे. टीम इंडियाला पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आलेले नाही. भारत 2021 आणि 2023 मध्ये फायनल खेळला होता. जिथे न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा पराभव केला. जगभरात प्रसिद्ध असलेल्या कसोटी क्रिकेटमधील टीम इंडिया हळूहळू आपली चमक गमावत आहे.




हे ही वाचा -


'तो तामिळनाडूचा असता तर आत्तापर्यंत वगळला...', माजी क्रिकेटपटू टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंवर संतापला, BCCIची काढली खरडपट्टी