Rohit Sharma: टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्यामुळे चर्चेत आहे. भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होत आहे. दरम्यान रोहित शर्माने इंस्टाग्रामवर ट्रेनिंगचा एक फोटो शेअर केला होता. मात्र काही तासांतच हा फोटो रोहित शर्मासाठी अडचणीचे कारण बनला होता. या फोटोमुळे त्याला ट्रोलिंगला समोरे जावं लागलं. यानंतर रोहित शर्माने तो फोटो सोशल मीडियावरुन हटवला.
नेमकं प्रकरण काय?
30 जुलै रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी बीसीसीआयने रोहित शर्माच्या प्रशिक्षणाचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण जेव्हा रोहितने हा फोटो शेअर केला तेव्हा चाहत्यांच्या लक्षात आले की फोटो एडिट करण्यात आला आहे. यामध्ये एडिट केलेल्या फोटोमध्ये रोहितने त्याचे पोट कमी केल्याचा दावा केला जात आहे. नेटकऱ्यांच्या हे लक्षात येताच सोशल मीडियावर या फोटोवरुन अनेक मीम्स आणि ट्रोलिंग करण्यात आले. यांतर रोहितने शेअर केलेली पोस्ट डिलिट केल्याचं समोर आलं.
रोहित ऐतिहासिक विक्रम नावावर करणार-
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये भारत विश्वविजेता झाल्यानंतर रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. परंतु तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहील. रोहित वनडे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक विक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय होण्यापासून तो केवळ 291 धावा दूर आहे. रोहितने 65 धावा केल्याबरोबर तो एमएस धोनीला मागे टाकेल आणि 180 धावा केल्यानंतर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल द्रविडचा विक्रम मोडेल.
टी-20 मालिका विजयानंतर गौतम गंभीर काय म्हणाला?
अप्रतिम मालिका विजयाबद्दल अभिनंदन. सूर्याचेही अभिनंदन. उत्तम कर्णधार आणि त्याची फलंदाजीही अप्रतिम होती. मी मालिका सुरू होण्यापूर्वी काहीतरी मागितले होते आणि तुम्ही ते दिले. जेव्हा तुम्ही सतत लढता, तेव्हा असेच घडते. तुम्ही हार मानू नका असा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धावासाठी लढत राहणे. या सामन्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हा एक शानदार मालिका विजय आहे. काही खेळाडू 50 षटकांच्या फॉरमॅटच्या मालिकेत भाग घेणार नाहीत. एक मोठा ब्रेक असेल..., असं गौतम गंभीरने सांगितले.
वनडे मालिकेचे वेळापत्रक-
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!