BCCI Injury Updates: भारतीय क्रिकेट संघातील (Team India) पाच स्टार खेळाडूंच्या दुखापतीबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाच प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यामधील चार खेळाडू विश्वचषकाआधी पुनरागमन करण्याची शक्यता वाढली आहे. सर्व खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव सुरु केला आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सरावाला सुरुवात केली आहे. पंतनेही नेटमध्ये सराव सुरु केला आहे.


भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, प्रमुख फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहेत. प्रसिद्ध कृष्णाही दुखापतग्रस्त असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. पण या खेळाडूच्या फिटनेसबाबत सकारात्मक बातमी समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा दुखापतीतून सावरले आहेत. या सर्व खेळाडूंनी सरवाला सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह बेंगलोरमधील एनसीएमध्ये दररोज 10 षटके गोलंदाजी करत आहे. तो आगामी आयर्लंड दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करु शकतो. 


स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि मिडिल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी उपलब्ध असतील. यांच्या फिटनेसमध्ये चांगली सुधारणा आहे. हे सर्व खेळाडू सध्या एनसीएमध्ये घाम गाळत आहेत. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या सरावाचे फोटो आणि व्हिडीओही गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


ऋषभ पंत याच्या दुखापतीबाबतही अद्याप अपडेट देण्यात आली आहे. ऋषभ पंत याने नेटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. पंत फलंदाजी आणि विकेटकिपरची सराव सुरु केला आहे. श्रेयस अय्यर, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सरावाला सुरुवात केली आहे.



बुमराहचा गोलंदाजीच्या सरावावर भर
बुमराह आणि अय्यर सध्या तब्येतीकडे विशेष लक्ष देत असून सरावावर भर देत आहे. बुमराहने गेल्या महिन्यापासून गोलंदाजी करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. बुमराह नेटमध्ये पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत आहे. बुमराहला आशिया कपमधील टीम इंडियाचा भाग बनवण्याची भारतीय संघ व्यवस्थापन आणि सिलेक्टर यांची इच्छा आहे. त्यामुळेच तो पुढील महिन्यात होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होऊ शकतो. बुमराह आयर्लंड दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 







अय्यरकडून नेट प्रक्टिसला सुरुवात
याशिवाय, श्रेयस अय्यरनेही नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. बुमराहसोबत अय्यरही पुढील महिन्यात आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोघेही तंदुरुस्त झाल्यास आशिया कप आधी टीम इंडियात सामील होऊ शकतात. आता याबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.