ENG vs IND : जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या तोडीचा संघ असणाऱ्या इंग्लंड संघाविरुद्ध भारत (Team India) आज मैदानात उतरणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील एजबेस्टन (Edgbaston) याठिकाणी हा सामना खेळवला जाईल. पण हे मैदान भारतासाठी अधिक खास नसल्याचं आजवर दिसलं आहे. कारण भारताला या मैदानात इंग्लंडविरुद्ध एकाही कसोटी सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.
भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली.
एजबेस्टन मैदानात भारताची कामगिरी
सामना | वर्ष | निर्णय |
भारत विरुद्ध इंग्लंड | 1967 | भारत पराभूत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 1974 | भारत पराभूत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 1979 | भारत पराभूत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 1986 | अनिर्णीत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 1996 | भारत पराभूत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 2011 | भारत पराभूत |
भारत विरुद्ध इंग्लंड | 2018 | भारत पराभूत |
अशी असू शकते संभावित प्लेईंग 11 - चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार),मोहम्मद सिराज.
इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.
हे देखील वाचा-
Rishabh Pant : सेल्फी घ्यायला आले फॅन्स, पण ऋषभ पंतने केलं असं काही की सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?