India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील हा एकमेव कसोटी सामना आहे. मूळात हा सामना म्हणजे मागील दौऱ्यातील उर्वरीत सामना आहे. मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असताना कोरोनाच्या शिरकावामुळे अखेरचा सामना खेळवता आला नव्हता. हात अखेरचा उर्वरीत कसोटी सामना आता खेळवला जात आहे. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


आज 1 जुलैपासून ते  5 जुलैपर्यंत हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरु होईल. 2 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


कसे आहेत दोन्ही संघ?


भारतीय संघ: मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.  


इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.


बर्मिंगमहमध्ये विजय अवघड


भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.


हे देखील वाचा-