India vs England : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Live) यांच्यात उद्या अर्थात 1 जुलैपासून कसोटी सामन्याला बर्मिंगहम येथे (IND vs ENG Bermingham Test) सुरुवात होणार आहे. या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करत असून खेळाडू मागील काही दिवस इंग्लंडमध्येच आहेत. इंग्लंडमध्ये शॉपिंगसाठी तसंच फिरण्यासाठी खेळाडू बाजारात गेल्याचेही मागील काही दिवस दिसत आहे. कारण अनेक खेळाडूंनी आपआपल्या सोशल मीडियावर फिरतानाचे तसेच फॅन्ससोबतचे फोटो शेअर केले होते. आता ऋषभ पंतचाही (Rishabh Pant) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोमागे एक खास कहाणी आहे, हा फोटो पोस्ट करणाऱ्या चाहत्यानेच त्याच्या पोस्टमध्ये हा किस्सा शेअर केला आहे.
एक सोशल मीडिया यूजर ध्रुव याने त्याच्या मित्रांसोबतचा पंतचा फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, पंतने आम्हाला सेल्फी दिला पण तो घेण्याच्या आधी त्याने त्यांना काहीवेळ थांबवून तिथेच रस्त्याशेजारी असलेल्या एका बेघर व्यक्तीला खाऊ दिला, तसंच त्याची विचारपूस करुन आणखी काही हवं आहे का? असंही विचारला. पंतच्या याच कृतीचं सर्व सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
कसं आहे टीम इंडियाचं वेळापत्रक?
1 जुलै ते 5 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडल्यावर पुढील सामने खालीलप्रमाणे होतील.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-
Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना
Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?