Team India : आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या (ICC T20 World Cup 2022) उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर तसंच मोठ्या स्पर्धांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुन्हा एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बीसीसीयकडून भारताचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याला टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदावरून (Team India t20 team Coach) हटवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. बोर्डाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाच्या टी20 संघासाठी नवीन कोचिंग सेटअप जानेवारीपर्यंत जाहीर केला जाऊ शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सूत्राने इनसाइडस्पोर्टला दिलेल्या माहितीत सांगितले की, 'आम्ही यावर गांभीर्याने विचार करत आहोत. राहुल द्रविड व्यस्त वेळापत्रकामुळे टी-20 संघाचा प्रशिक्षक बदलण्याची गरज आहे. त्यामुळे भारतीय टी20 संघाला लवकरच नवीन कोच मिळू शकतो. बीसीसीआयनं कोणाकडे टी-20 प्रशिक्षकपद सोपवणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, या पदासाठी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) नाव पुढे येत आहे.
कर्णधार म्हणूनही हार्दिकला संधी मिळण्याची शक्यता
बीसीसीआयच्या एका सूत्राने यापूर्वी माहिती देताना सांगितले होते की, 'रोहित शर्मा कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. रोहितकडे सध्या खूप जबाबदारी आहे. त्यामुळे टी20 कर्णधारपदाचा भार हलका करण्याची गरज आहे. तसंच बीसीसीआयला आतापासूनच 2024 टी-20 विश्वचषकाची तयारी करावी लागेल. या भूमिकेसाठी हार्दिक फिट आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पांड्याला टी-20 चा कर्णधार म्हणून अधिकृतपणे घोषित केले जाऊ शकते. तसंच लक्ष्मण, शास्त्री असे माजी दिग्ग क्रिकेटर सतत हार्दिकची शिफारस करत आहेत. तसच नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बोर्ड लवकरच हार्दिकला नवीन टी-20 कर्णधार म्हणून घोषित करू शकते. रोहित शर्माचे वाढते वय आणि तिन्ही फॉरमॅटची जबाबदारी पाहता हा बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड दौरा संपल्यानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे आणि या मालिकेपूर्वीच हार्दिकला कायमस्वरूपी कर्णधारपद मिळू शकते.