India vs Bangladesh 2022 : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात सुरु एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने भारताने गमावले, ज्यामुळे मालिकाही भारताच्या हातातून निसटली आहे. या पराभवामुळे भारतावर एक मोठी नामुष्की ओढावली आहे. 2015 नंतर पहिल्यांदाच भारताने बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना भारताने एका विकेटने तर दुसरा सामना अवघ्या 5 धावांनी गमावला. आता तिसरा सामना 10 डिसेंबर रोजी खेळवला जाणार असून तो जिंकल्यास भारत व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचणार आहे.
भारताच्या बांगलादेश दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवले जात आहेत. यातील एकदिवसीय मालिकेतील दोन्ही सामने अतिशय रंगतदार झाले. ज्यामध्ये बांगलादेशने रोमहर्षक असा विजय मिळवला. भारताने पहिला सामना एका विकेट्च्या फरकाने गमावला. त्यानंतर दुसरा सामना भारताने 5 धावांनी गमावला. दोन्ही सामन्यात बांगलादेशच्या मेहदी हसननं दमदार अशी झुंज देत सामना जिंकण्यात मोठा वाटा उचलला. दरम्यान या पराभवानंतर बांगलादेशनं मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. याआधी भारताने 2015 मध्ये बांगलादेशविरुद्ध 2-1 ने मालिका गमावली होती. भारताचा बांगलादेशविरुद्ध वनडे रेकॉर्ड्स तसे चांगले आहेत. टीम इंडियाने 2004 मध्ये 2-1 ने मालिका बांगलादेशविरुद्ध जिंकली असून त्यानंतर 2007 मध्येही 2-0 ने भारताने मालिका जिंकली असून 2014 मध्येही भारत जिंकला होता.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांतील पहिले दोन्ही सामने बांगलादेशला जिंकवण्यात बांगलदेशच्या मेहदी हसनचा मोठा हात आहे. मेहदीने दोन सामन्यातील दोन्ही डावात मिळून 138 धावा केल्या. त्यानंतर भारताच्या श्रेयस अय्यरचा नंबर लागतो. त्यानेही दोन सामन्यातील दोन्ही डावात मिळून 106 रन केले आहेत. याशिवाय सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत शाकिब अल् हसन 7 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्याच्यासोबत इबादत हुसैनही 7 विकेट्ससह संयुक्तरुपाने अव्वलस्थानी आहे.
कसोटी मालिकेत विजयाची संधी
भारताने एकदिवसीय मालिका जरी गमावली असली तरी, भारताकडे कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. एकदिवसीय मालिकेतील एक सामना 10 डिसेंबरला होणार असून त्यानंतर कसोटी मालिका 14 डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे. तर कसोटी सामन्यांचं नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14 ते 18 डिसेंबर | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22 ते 26 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-
Rohit Sharma : रोहित दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेला मुकणार? या खेळाडूला मिळू शकते संधी