IND vs SL, 2nd Innings Highlight: भारतीय क्रिकेट संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आणखी एका अप्रतिम विजयाची नोंद केली आहे. भारताने कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात 238 धावांनी श्रीलंकेला मात देत सामना जिंकला आहे. तर मालिकेतही 2-0 ने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे भारतीय भूमीत भारताचा हा सलग 15 वा मालिका विजय आहे. सामन्यात आधी भारताने 252 धावा करत श्रीलंकेला 109 धावांत सर्वबाद केलं. ज्यानंतर दुसऱ्या डावात 303 धावा करत श्रीलंकेसमोर 446 धावांचे आव्हान ठेवले. पण श्रीलंकेचा संघ 208 धावांत सर्वबाद झाल्याने भारत 238 धावांनी विजयी झाला आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M.Chinnaswamy Stadium) हा सामना पार पडला. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात श्रेयस अय्यरच्या 92 धावांच्या जोरावर 252 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाला भारताने 109 धावांवर सर्वबाद केले. मॅथ्यूजच्या 43 धावा सोडता श्रीलंकेच्या संघाला खास कामगिरी करता आली नाही. भारताकडून बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या. तर त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं अय्यरच्या 67, पंतच्या 50 आणि रोहितच्या 46 धावांच्या जोरावर 9 बाद 303 धावांवर डाव घोषित केला. ज्यामुळे श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 446 धावांची गरज होती. पण भारताने श्रीलंकेला 208 धावांत सर्वबाद केल्याने भारत 238 धावांनी सामना जिंकला आहे. यावेळी आश्विनने 4, बुमहारने 3 आणि अक्षरने 2 तर जाडेजाने एक विकेट घेतली आहे.   


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha