IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलला पंधाराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून (Playing 11) डीआरएसपर्यंत (DRS) काही बदल करण्यात आलेत. दरम्यान, कोरोना महामारीचा (COVID-19) क्रिडाविश्वावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालंय. आयपीएलच्या संघातील कोणताही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करता येणार आहे, असाही नियम बनवण्यात आलाय. 


प्लेईंग इलेव्हनबाबत नवा नियम काय?
बीसीसीआयच्या हवाल्यानं क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी, संबंधित संघाला अनेक समस्यांना सामोरे जावा लागले आहे. मात्र, बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, कोरोनामुळं संघाला प्लेइंग इलेव्हन तयार करण्यात अडचण आल्यास त्यांचा सामना पुन्हा शेड्युल केला जाणार आहे. मात्र, त्यानंतरही हा सामना होऊ न शकल्यास तांत्रिक समितीकडे हे प्रकरण पाठवलं जाईल. जर एखादा संघ सामना रिशेड्युल करण्यास अपयशी ठरल्यास त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण दिले जाणार आहेत. 


डीआरएसच्या नियमातील बदल महत्त्वाचा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्रत्येक संघाला एकूण चार डीआरएस मिळणार आहेत. त्यातील दोन डीआरएस फलंदाजी आणि इतर दोन क्षेत्ररक्षण करताना वापरता येणार आहे. म्हणजे, संघाला प्रत्येक डावात दोन डीआरएस असणार आहेत. याआधी संघाला एका डावात केवळ एक डीआरएस मिळायचा.


सुपर ओव्हरबाबत बीसीसीआयनं घेतला हा निर्णय
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सुपर ओव्हरबाबत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात सामना अनिर्णित ठरल्यास सुपर ओव्हर खेळली जाते. परंतु, सुपर ओव्हर खेळल्यानंतरही सामन्याचा निकाल न लागल्यास दोन्ही संघाचा लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल.  जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha